Electric Scooter : जबरदस्त..! FREE मध्ये बुक करा ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर; रेंज १०० किमी!

WhatsApp Group

Mihos Electric Scooter : देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वॉर्डविझार्डच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड जॉय ई-बाईकने ऑटो एक्सपोमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Mihos लाँच केली. आता कंपनीने या हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरचे अधिकृत बुकिंग जाहीर केले आहे. या स्कूटरची बुकिंग येत्या २२ जानेवारीपासून अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिपद्वारे करता येईल. विशेष म्हणजे, कंपनीने आपले बुकिंग मोफत सुरू केले आहे, म्हणजेच बुकिंगसाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही.

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिहोस इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. ऑटो एक्सपोमध्ये कंपनीने ही स्कूटर १.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च केली आहे. मात्र, ही किंमत पहिल्या ५००० ग्राहकांसाठीच लागू असेल. आकर्षक देखावा आणि शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटरने सजलेली ही स्कूटर अतिशय मजबूत बनवण्यात आली आहे.

या स्कूटरच्या बॉडीच्या बांधकामात पॉली डायसायक्लो पेंटाडीन (पीडीसीपीडी) वापरण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे, ज्यामुळे ती खूप मजबूत आहे. या स्कूटरच्या लॉन्चिंगदरम्यान कंपनीने त्याच्यावर हातोडा मारून आपली ताकद दाखवून दिली होती. याशिवाय नवीन मिहोसमध्ये स्मार्ट आणि आरामदायी फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

book Joy e-Bike Mihos Electric Scooter for free check price and range

हेही वाचा – PPF Scheme : तुम्हाला २५ वर्षात करोडपती बनायचंय? ‘या’ सरकारी योजनेमुळं शक्य होईल!

आकाराच्या बाबतीत, स्कूटरची लांबी १८६४ मिमी, रुंदी ७०० मिमी आणि उंची ११७८ मिमी आहे. याचा व्हीलबेस १३६० मिमी आहे. याशिवाय समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की हे भारतीय रस्ते लक्षात घेऊन डिझाइन केले आहे, या स्कूटरला १७५ मिमी ग्राउंड क्लीयरन्स देण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, या स्कूटरला साइड स्टँड सेन्सर, हायड्रॉलिक कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम (CBS) सारखी वैशिष्ट्ये आहेत.

बॅटरी पॅक आणि रेंज

MIHOS मध्ये, कंपनीने २.५ kWh क्षमतेचा Li-Ion बॅटरी पॅक वापरला आहे, जो एका चार्जमध्ये १०० किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देतो. या स्कूटरमध्ये दिलेली १५०० W इलेक्ट्रिक मोटर ९५ Nm चा टॉर्क जनरेट करते,तिचा टॉप स्पीड ७० किलोमीटर प्रति तास आहे. कंपनीचा दावा आहे की सामान्य घरगुती चार्जरने त्याची बॅटरी अवघ्या ४ तासांत पूर्ण चार्ज होते. नवीन स्कूटर पिक-अपच्या बाबतीतही चांगली आहे, ही स्कूटर ० ते ४० किलोमीटर प्रति तासाचा वेग फक्त ७ सेकंदात पकडते.

स्मार्ट फीचर्स

कंपनीने Mihos मध्ये कनेक्टिव्हिटी फीचर्स दिले आहेत, तुम्ही या स्कूटरला कंपनीच्या समर्पित अॅपद्वारे ब्लूटूथद्वारे तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता. या स्कूटरच्या बॅटरीची स्थिती तपासण्यासाठी, तुम्हाला स्कूटरचा डिस्प्ले पाहण्याची गरज नाही, तर तुम्ही ती दूरस्थपणे तपासू शकता. यात रिव्हर्स मोड देखील आहे, ज्यामुळे पार्किंग सोपे होते. जीपीएस सेन्सिंग, रिअल टाइम पोझिशनिंग, जिओ फेन्सिंग तुमची राइड आरामदायी बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment