BJP MLAs Playing Game And Chewing Tobacco In Assembly : उत्तर प्रदेशातील महोबा मतदारसंघातील एक भाजप आमदार विधानसभेत तंबाखू खाताना तर दुसरे आमदार तीन पत्ती गेम खेळताना दिसले. समाजवादी पार्टी मीडियाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट केलं की महोबाचे भाजप आमदार विधानसभेत गेम खेळत आहेत. कर्नाटकात भाजपचे आमदार मोबाईलवर पॉर्न पाहताना आढळले होते. समाजवादी पक्षाच्या मीडिया विंगने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, भाजप आमदारांना सार्वजनिक समस्यांशी काहीही देणेघेणे नाही. ते फक्त भ्रष्टाचार, बलात्कार आणि फालतू खेळ यात गुंतले आहेत. हे भाजपचे लोकसेवक आणि लोकप्रतिनिधी आहेत का? लाजिरवाणे..
या घटनेवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिले, “आता मी दीड लाखांचा फोन घेतला आहे, तर हीच आशा आहे.” दुसऱ्या यूजरने लिहिले की, “कोणी त्यालाही निलंबित करेल का? सरकारी नोकरांची चौकशी झाली असती आणि आतापर्यंत कारवाई झाली असती.” तिसऱ्या युजरने लिहिले, “लज्जास्पद.” व्हिडिओ २२ सप्टेंबर २०२२ चे सांगितले जात आहेत. या दिवशी सभागृहाचे कामकाज महिला सदस्यांना समर्पित करण्यात आले. मुख्यमंत्री योगी यांनी हा दिवस ऐतिहासिक असल्याचे म्हटले होते.
हेही वाचा – VIDEO : “लोकांच्या भावनेशी खेळू नकोस..!”, धोनीचा ‘तो’ प्रकार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर!
सदन की गरिमा को तार-तार कर रहे भाजपा विधायक!
महोबा से भाजपा विधायक सदन में मोबाइल गेम खेल रहे, झांसी से भाजपा विधायक तंबाकू खा रहे।
इन लोगों के पास जनता के मुद्दों के जवाब हैं नहीं और सदन को मनोरंजन का अड्डा बना रहे।
बेहद निंदनीय एवं शर्मनाक ! pic.twitter.com/j699IxTFkp
— Samajwadi Party (@samajwadiparty) September 24, 2022
— Samajwadi Party (@samajwadiparty) September 24, 2022