

KS Eshwarappa : कर्नाटकचे बंडखोर नेते केएस ईश्वरप्पा यांच्यावर भाजपने कारवाई केली आहे. ईश्वरप्पा यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. आपल्या मुलाला हावेरीमधून लोकसभेचे तिकीट न दिल्याने संतापलेल्या ईश्वरप्पा यांनी शिवमोग्गा येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. ईश्वरप्पा यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक आयोगाकडून ऊस उत्पादक निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
ईश्वरप्पा यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती आणि आपल्या मुलाला हावेरीतून तिकीट देण्याची मागणी केली होती. मात्र तसे न झाल्याने ते बंडखोर झाले आणि त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ते येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय राघवेंद्र यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ईश्वरप्पा यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी ते मान्य केले नाही.
हेही वाचा – युझवेंद्र चहलचा सर्वात मोठा विक्रम, आयपीएलच्या इतिहासातील ठरला पहिला गोलंदाज!
भाजपने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, ईश्वरप्पा यांनी पक्षाच्या प्रोटोकॉलच्या विरोधात जाऊन ही लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षासमोर पेच निर्माण झाला आहे. यानंतर पक्षाने हे पाऊल उचलले असून त्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा शिवमोग्गा लोकसभा मतदारसंघातून बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय राघवेंद्र यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. आपला लढा माजी मुख्यमंत्री आणि लिंगायत नेते बीएस येडियुरप्पा यांच्या कुटुंबाविरुद्ध असल्याचे ईश्वरप्पा यांचे म्हणणे आहे. हावेरी मतदारसंघातून आपला मुलगा केई कांतेश यांना तिकीट न दिल्याने संतापलेल्या ईश्वरप्पा यांनी येडियुरप्पा यांच्यावर आरोप केले होते. इतकंच नाही तर ते त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधानांच्या चित्राचा वापर करत होते, भाजपने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा