बॉलिवूडमधून गूड न्यूज..! बिपाशा बसू-करण सिंग ग्रोव्हर झाले आई-वडील

WhatsApp Group

Bipasha Basu and Karan Singh Grover Child : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आई झाली आहे. तिने आज १२ नोव्हेंबर रोजी छोट्या राजकुमारीला जन्म दिला आहे. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. दोघेही आपल्या बाळासाठी खूप उत्सुक होते, अखेर लग्नाच्या ६ वर्षानंतर या जोडप्याची प्रतीक्षा संपली. बिपाशाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या मुलीच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली आहे.

बाळाच्या जन्माआधीच बिपाशाने बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की, तिच्या घरी मुलगी जन्माला यावी. मीडियाशी बोलताना बिपाशा म्हणाली होती, की जेव्हाही मुलाचा प्रश्न आला तेव्हा तिला आणि करणला नेहमी वाटत होतं की घरात मुलगी जन्माला यावी.”

हेही वाचा – Video : सचिन तेंडुलकरला टीम इंडियाचा पुळका? टीका करणाऱ्यांना म्हणाला, ”तुम्ही फक्त…”

३० एप्रिल २०१६ रोजी बिपाशा आणि करणचे लग्न झाले होते. करण आणि बिपाशा ‘अलोन’च्या सेटवर भेटले होते. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर करण आणि विपाशाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. बिपाशा करणची तिसरी बायको आहे, त्याआधी करणने टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट आणि श्रद्धा निगमसोबत लग्न केले होते, पण दोघांचे लग्न काही काळच टिकले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment