चार्ली मुंगेर यांचे ‘हे’ सल्ले म्हणजे बक्कळ कमाई करण्याची संधीच!

WhatsApp Group

शेअर मार्केटमधून बक्कळ पैसा कमवायचा असेल, तर पहिले मार्केट नीट समजून घेणे आवश्यक आहे. अनेक बडे गुंतवणूकदार त्यांचे मार्केटमधील अनुभव शेअर करतात. त्यामुळे आपल्यालाही जग समजून घेणे सोपे होते. या मार्केटमध्ये चार्ली मुंगेर (Charlie Munger) यांचे मोठे नाव आहे. वयाच्या 99व्या वर्षी त्यांचे निधन झाले. दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांचे भागीदार म्हणून मुंगेर प्रसिद्ध होते. त्यांनी मार्केटबद्दल अनेक मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत.

मुंगेर यांना शेअर मार्केटमध्ये अनेक दशकांचा अनुभव होता. बर्कशायर हॅथवे (Berkshire Hathaway) या महाकाय अमेरिकन कंपनीत त्यांनी दीर्घकाळ मोठी जबाबदारी सांभाळली. बफे यांनी मुंगेर यांच्यावर खूप विश्वास ठेवला. शेअर्सचे जग समजून घेण्यासाठी मुंगेर यांचे महत्त्वाचे सल्ले गुंतवणूकदारांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

गोष्टी स्वतःच्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करा

मुंगेर म्हणाले होते, की जे बिजनेस स्कूलमध्ये शिकणार आहेत किंवा आधीच शिकत आहेत त्यांना माझा सल्ला आहे की त्यांनी त्यांच्या पद्धतीने गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा तुम्ही अभ्यास केल्यानंतर शाळेतून बाहेर पडण्याच्या स्थितीत असाल तेव्हा तुम्हाला त्या अभ्यासाची संपूर्ण समज असली पाहिजे. बहुतेक लोक या गोष्टीला हलक्यात घेतात किंवा त्याचा अर्थ समजत नाहीत.

काही लोकांच्या चुका काही लोकांना श्रीमंत बनवतात

मुंगेर यांचा विश्वास होता, की शेअर्समध्ये गुंतवणूक करताना लोक अनेकदा चुका करतात. जर काही लोकांनी चुका केल्या नाहीत, तर काही लोक श्रीमंत कसे होतील. त्यांनी आपली चूकही सांगितली. या वर्षी फेब्रुवारीमध्ये डेली जर्नलच्या भागधारकांच्या वार्षिक बैठकीत त्यांनी चीनी ई-कॉमर्स आणि तंत्रज्ञान कंपनी अलीबाबामध्ये गुंतवणूक करणे ही चूक असल्याचे म्हटले होते.

जीवनाबद्दल आशावादी विचार करणे महत्वाचे

मुंगेर यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आशावादी होता. ते म्हणायचे, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर जेव्हा मी इतका आशावादी असू शकतो, तर तुम्ही महागाईसारखी छोटी समस्या का सोडवू शकत नाही, जर तुमच्या जीवनाविषयी विशेष अपेक्षा असतील तर आधी त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःला योग्य बनवावे लागेल. तरुणांनी कालपेक्षा दुसऱ्या दिवशी शहाणे होण्याचा प्रयत्न करावा.

दररोज काही वेळ बसून गोष्टींबद्दल बोलणे महत्वाचे आहे

गोष्टींचा विचार करणे आणि समजून घेणे महत्वाचे आहे. मुंगेर म्हणाले होते, ”मी आणि बफे रोज बराच वेळ एकत्र बसायचो आणि गोष्टींवर गप्पा मारायचे. अमेरिकन कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ही सामान्य गोष्ट नाही. गोष्टी समजून घेण्यात आणि शिकण्यात रस असेल तर इतिहासापेक्षा मोठा शिक्षक कोणी नाही. अब्जावधी डॉलर किमतीच्या प्रश्नांची उत्तरे $30 इतिहासाच्या पुस्तकात मिळतील.”

मुंगेर त्यांच्या प्रामाणिकपणा आणि स्पष्ट विचारांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि विशेषतः प्रामाणिकपणाने झिरोधाचे सहसंस्थापक नितीन कामत यांच्यासह अनेक दिग्गजांना प्रेरणा दिली आहे. मुंगेर कमालीचे प्रामाणिक आहेत, ते मला खुप आवडतात, असे ट्वीट कामत यांनी केले होते.

हेही वाचा – मोदींकडून 51000 तरुणांना जॉब लेटर, 37 ठिकाणी होणार रोजगार मेळावा

मुंगेर यांनी वॉरन बफे यांचे सहाय्यक आणि सल्लागार म्हणून जवळपास 60 वर्षे काम केले. कॅलिफोर्नियातील रुग्णालयात मंगळवारी त्यांचे निधन झाले. मुंगेर हे कंपनीत सर्वात मोठ्या शेअरहोल्‍डरपैकी एक होते, ज्‍याच्‍या शेअरची किंमत सुमारे 2.2 बिलियन डॉलर्स होती. फोर्ब्सच्या मते, त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 2.6 बिलियन डॉलर्स आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment