Notice of Rs 37.5 lakh to Wager : उत्पन्न आठाण्याचं आणि टॅक्स लाखोंचा…हो तुम्ही बरोबर ऐकलंय. बिहारमधील एका रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराला आयकर विभागानं ३७.५ लाख रुपयांची आयकर नोटीस पाठवली आहे. हा मजूर दिवसाला जेमतेम ५०० रुपये कमावतो आणि आयकर विभागानं त्याला लवकरात लवकर थकबाकी जमा करण्याची नोटीस पाठवली आहे. बिहारच्या खगरिया जिल्ह्यातील माघौना गावातील गिरीश यादव नावाच्या एका रोजंदारी मजुराची ३७.५ लाख रुपयांच्या थकबाकीची आयकर विभागाची नोटीस पाहून थक्क झाले. मात्र, यासंदर्भात त्यानं स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.
पॅनकार्डवर आलीय नोटीस…
अलौली पोलीस स्टेशनचे एसएचओ पुरेंद्र कुमार यांनी सांगितलं, की गिरीश यादवनं दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रथमदर्शनी हे फसवणुकीचं प्रकरण असल्याचं दिसतं. गिरीश कुमारला त्यांच्या नावानं जारी करण्यात आलेल्या पॅनकार्डवर ही नोटीस मिळाली आहे.
हेही वाचा – तरुणांनो खूप दारू प्या..! जपान सरकारनं केलंय आवाहन; ‘हे’ आहे कारण!
दिल्लीत नोकर म्हणून काम करतो, असं गिरीश यादव सांगतात. जिथं त्यानं एकदा दलालामार्फत पॅनकार्ड मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नंतर तो त्या दलालाला भेटला नाही. नोटीसमध्ये म्हटलं आहे, की गिरीश राजस्थानमधील एका कंपनीशी संबंधित आहे, परंतु ते असा दावा करतो की तो कधीच राजस्थानला गेला नाही. पॅन कार्ड, आधार आणि इतर ओळखपत्रांच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना अनेकदा समोर येतात. सरकार लोकांना वेळोवेळी इशारा देते की त्यांनी या कागदपत्रांचा सुज्ञपणे वापर करावा. तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र कोणालाही देण्यापूर्वी योग्य तपास करावा.
हेही वाचा – ‘ईडी’ म्हणजे काय रे भाऊ? कोण असतात ‘ईडी’तील माणसं?
बिहारमध्ये गंभीर परिस्थिती
या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्यामुळं बिहारमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या धानासह खरीप पिकांना फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी व शेतमजुरांसमोर उदरनिर्वाहाचं संकट उभं ठाकलं आहे. अशा परिस्थितीत पाटण्यातील मजुरांनी इतर राज्यात स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळाचा धोका लक्षात घेता दिल्ली, मुंबई, पंजाब, हरियाणा आणि इतर ठिकाणी मजूर रोजगाराच्या शोधात निघून जात आहेत.