Bharat Jodo Yatra National Anthem Video : महाराष्ट्रातील वाशिम येथे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या कार्यक्रमात राष्ट्रगीताऐवजी चुकीचे गाणे वाजवले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या चुकीसाठी भाजप नेत्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला जबाबदार धरले. महाराष्ट्र भाजप नेते नितेश राणे यांनीही या घटनेचा व्हिडिओ शेअर करत राहुलची कॉमेडी सर्कस असल्याचे ट्वीट केले आहे. तामिळनाडूचे भाजप नेते अमर प्रसाद रेड्डी यांनीही हाच व्हिडिओ शेअर करत लिहिले की, राहुल गांधी, हे काय आहे?
खरं तर, महाराष्ट्रातील वाशिममध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी आणि काही काँग्रेस नेते एका मंचावर लोकांना संबोधित करत होते. दरम्यान, राहुल गांधी यांनी शेजारी उभ्या असलेल्या नेत्यांना राष्ट्रगीत वाजवण्यास सांगितले मात्र चुकून दुसरेच गाणे वाजू लागले. सुमारे पाच सेकंद राहुल गांधी सावध मुद्रेत उभे राहिले, पण नंतर चुकीचे गाणे वाजवले जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी नेत्यांना थांबवून राष्ट्रगीत वाजवण्यास सांगितले.
Papu ka comedy circus 😂 pic.twitter.com/tKQ0FDa5Vl
— nitesh rane (@NiteshNRane) November 16, 2022
हेही वाचा – नारायण राणेंच्या ‘अधीश’ बंगल्यावर हातोडा; स्वत: हटवतायत बेकायदेशीर बांधकाम!
National Song of which Country?? pic.twitter.com/bWgZaBqsPC
— Rishi Bagree (@rishibagree) November 16, 2022
भाजप नेते नितेश राणे यांनी राहुलची कॉमेडी सर्कस असल्याचे ट्वीट केले आहे. त्याचवेळी भाजप नेते अमर प्रसाद रेड्डी यांनीही हाच व्हिडिओ शेअर करत लिहिले की, राहुल गांधी, हे काय आहे? त्याचबरोबर सोशल मीडिया यूजर्सनीही राहुल गांधींची खिल्ली उडवली.