Maruti Brezza Offer : भारतात एसयूव्ही (SUV) सेगमेंटची मागणी खूप जास्त आहे. या विभागातील एसयूव्हीची विक्री चांगली होत आहे. मारुती सुझुकी ब्रेझ्झा (Brezza) ही या सेगमेंटची एसयूव्ही आहे आणि चांगल्या किंमतीमध्ये विकली जात आहे. यावर्षी मारुती सुझुकीने ब्रेझ्झाचे फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च केले आहे, त्यानंतर विक्री आणखी वाढली आहे. तथापि, जेव्हापासून कंपनीने ब्रेझ्झा एसयूव्ही प्रथमच लॉन्च केली तेव्हापासून ग्राहकांमध्ये चांगली पकड निर्माण झाली आहे.
सध्या ब्रेझ्झाचे २०२२ फेसलिफ्ट व्हर्जन विकले जात आहे, ज्याची किंमत सुमारे ८ लाख रुपयांपासून सुरू होते. परंतु, जर एखाद्या व्यक्तीचे बजेट इतके नसेल तर तो जुन्या ब्रेझ्झाचा विचार करू शकतो. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या अनेक वापरलेल्या ब्रेझ्झा आम्हाला मिळाल्या आहेत. आम्ही तुमच्यासाठी यापैकी काहींची माहिती घेऊन आलो आहोत, ज्यांची किंमत ३.८ लाख रुपयांपासून सुरू होते.
हेही वाचा – मुकेश अंबानींना मिळाली सून..! मुलगा अनंत अंबानीचं ठरलं लग्न; पाहा Photo
येथे सूचीबद्ध केलेली Vitara Brezza VDI या २०१७ मॉडेलची किंमत रु. ३,८०,००० आहे. ही फर्स्ट ओनर कार आहे पण खूप चालवली गेली आहे. कारने एकूण २५४६८४ किमी अंतर कापले आहे. ही गाडी मानेसरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि ती मानेसरमध्ये नोंदणीकृत देखील आहे. ही डिझेल इंजिन कार आहे.
येथे सूचीबद्ध केलेली २०१८ मॉडेल Vitara Brezza LDI रु. ४,९०,००० आहे. ही फर्स्ट ओनर कार आहे आणि एकूण ९०७९५ किमी धावली आहे. ही कार कोलकातामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि तेथे नोंदणीकृत आहे. ही देखील डिझेल इंजिन कार आहे. त्यावर एक वर्षाची वॉरंटीही आहे.
येथे सूचीबद्ध केलेली २०१६ मॉडेल Vitara Brezza LDI (O) ५,३०,००० रुपये आहे. ही फर्स्ट ओनर कार आहे पण एक लाख किमी पेक्षा जास्त धावली आहे. कारमध्ये डिझेल इंजिन असून ते कुरुक्षेत्र येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याची नोंदणीही कुरुक्षेत्राची आहे.
येथे सूचीबद्ध केलेली २०१८ मॉडेल Vitara Brezza ZDI ची किंमत रु. ५,५०,००० आहे. फर्स्ट ओनर कार आहे आणि एकूण ८३५८८ किमी धावली आहे. कारमध्ये डिझेल इंजिन आहे. गोरखपूरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आगे. त्याची नोंदणीही फक्त गोरखपूरची आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!