Bentley Flying Spur Hybrid : बेंटलीने भारतात फ्लाईंग स्पर हायब्रिड कार लाँच केली आहे. या गाडीची किंमत 5.25 कोटी (एक्स-शोरूम) आहे. अल्ट्रा लक्झरी सेडानपूर्वी V8 आणि W12 इंजिनसह उपलब्ध होती. आता कंपनीने फ्लॅगशिप सेडानसह प्लग-इन हायब्रिड पॉवरट्रेन सादर केली आहे. सेडानची विक्री भारतात केवळ गुरुग्रामस्थित एक्सक्लुझिव्ह मोटर्सद्वारे केली जाईल, जी देशातील बेंटलेची एकमेव वितरक आहे. इतर बेंटली प्रमाणे, फ्लाइंग स्पर हायब्रिड 60 पेक्षा जास्त एक्सटीरियर कलर ऑप्शन्ससह अनेक कस्टमाइजेशन ऑप्शन्ससह येईल. एक्सटीरियरप्रमाणेच आतील भागातही अनेक कस्टमायझेशन पर्याय असतील.
फीचर्स
बाहेरील व्हिज्युअल हायलाइट्समध्ये गडद टिंट ट्रीटमेंटसह मॅट्रिक्स ग्रिल, वर्तुळाकार LED हेडलाइट्स, क्रिस्टल सारखी DRL, 10-स्पोक 22-इंच अलॉय व्हील आणि स्क्वेअर-आउट LED टेललाइट्स समाविष्ट आहेत. फीचर्सच्या बाबतीत, ही गाडी 12.3-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 21-चॅनेल साउंड सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ आणि मल्टी-कलर अॅम्बियंट लाइटिंगसारख्या अनेक फीचर्सनी सुसज्ज आहे.
हेही वाचा – IND vs AUS : शुबमन गिलचे यंदाचे 5वे शतक, नव्या विक्रमाला गवसणी!
पॉवरट्रेन
या गाडीला उर्जा देण्यासाठी, 2.9-लीटर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन वापरले गेले आहे, जे 18 kWh बॅटरीसह जोडलेले आहे. हे इंजिन 5500-6500 rpm वर 410 bhp आणि 2000-5000 rpm वर 550 Nm उत्पादन करण्यास सक्षम आहे. इलेक्ट्रिक मोटरसह ही प्लग-इन हायब्रिड पॉवरट्रेन 536 bhp आणि 750 Nm निर्मिती करते.
परफॉरमन्स
परफॉरमन्सबद्दल बोलायचे झाल्यास, ही गाडी 4.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो आणि 285 किमी प्रतितास इतका वेग प्राप्त करू शकतो. 800 किमीच्या अंदाजे रेंजसह ही आतापर्यंतची सर्वाधिक मायलेज असलेली बेंटली कार आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!