Viral Video : बंगळुरूमध्ये पैशांचा पाऊस..! नोटा जमवण्यासाठी लोकांची गर्दी; सर्वत्र खळबळ!

WhatsApp Group

Viral Video : तुम्ही वाटेत जात असाल आणि अचानक वरून नोटांचा पाऊस पडू लागला तर तुम्ही काय कराल? आश्चर्यचकित व्हाल किंवा पैसे जमवण्यात व्यस्त व्हाल. असाच काहीसा प्रकार बंगळुरूमध्ये घडला, जिथे शहरातील गजबजलेल्या भागात अचानक वरून नोटा पडू लागल्या, त्यामुळे सगळीकडे चर्चा होऊ लागली. यादरम्यान अनेकांनी नोटा जमा करण्यास सुरुवात केली तर काही लोक हा संपूर्ण प्रकार पाहत राहिले.

वास्तविक, नोटांचा हा पाऊस आकाशातून नाही तर ब्रिजवरून होत होता. ब्रिजवर एक तरुण उभा होता. मंगळवारी सकाळी बंगळुरूच्या व्यस्त केआर मार्केटमधील फ्लायओव्हरवरून एका तरुणाने १० रुपयांच्या नोटा फेकण्यास सुरुवात केल्याने सर्वांची धावपळ झाली आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

व्हिडिओमध्ये नोट फेकणारा तरुण काळा कोट परिधान केलेला दिसत आहे आणि त्याच्या गळ्यात भिंतीवरचे घड्याळ लटकलेले आहे. यामध्ये ब्रिजच्या खालील नागरिकांनी आपल्या आजूबाजूला विखुरलेल्या नोटा जमवण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे काही काळ ब्रिजवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

हेही वाचा – हॉटेल, मोटेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्टमध्ये फरक काय? समजून घ्या!

हा तरुण नोटांचे बंडल उघडून ब्रिजखाली फेकत असताना तिथे उभ्या असलेल्या लोकांनी नोटा हिसकावून घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो तरुण पुलाच्या पलीकडे जाऊन नोटांचे बंडल उघडतो आणि नोटा फेकण्यास सुरुवात करतो. दुसऱ्या बाजूला खाली उभे असलेले लोक नोटा जमावू लागले. तरुणाला अशाप्रकारे नोटा उडवताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोट फेकणारा तरुण ३० ते ४० वर्षांचा असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने सांगितले की, प्राथमिक तपासात त्याने १० रुपयांच्या एकूण ३००० रुपयांच्या नोटा फेकून दिल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment