कर्नाटकातील चित्रदुर्गात आई आणि मुलाच्या नात्याला तडा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीची (AI Firm CEO) महिला सीईओ सूचना सेठने (Suchana Seth Crime News) तिच्याच 4 वर्षांच्या मुलाची हत्या केली. एवढेच नाही तर ही महिला गोव्याहून बंगळुरूला मुलाचा मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी बॅगेत घेऊन जात होती, मात्र पोलिसांनी तिला अटक केली. सूचना ही 2020 मध्ये सुरू झालेल्या माइंडफुल एआय लॅबची (Mindful AI Lab) संस्थापक आहे.
सुचना सेठची माइंडफुल एआय लॅब डेटा सायन्स टीम आणि स्टार्टअप्सना सल्ला देण्याचे काम करते. यासह, ती मशीन लर्निंग सोल्यूशन्स प्रदान करते. सुचनाला या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव आहे. या महिलेचा 2020 मध्ये एआय एथिक्समधील टॉप-100 प्रतिभावान महिलांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
सूचना सेठने हार्वर्ड विद्यापीठाच्या बर्कमन क्लेन सेंटरमध्ये फेलोशिप केली आहे. बर्कमन आणि डेटा अँड सोसायटी येथे बिजनेसमध्ये एथिकल मशीन लर्निंग आणि एआय कार्यान्वित करण्याच्या पद्धतींचा अभ्यास केला. यानंतर, 2020 मध्ये, तिने द माइंडफुल एआय लॅबची स्थापना केली, जे एआय आधारित स्टार्टअप आहे. सुचनाकडे आर्टिफिशियल लँग्वेज, मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि टेक्स्ट मेलिंग या क्षेत्रात 4 अमेरिकन पेटंट्स आहेत.
हत्येचा खुलासा
सूचना ही आपल्या मुलासोबत गोव्यातील कँडोलिम येथील हॉटेलमध्ये थांबली होती, परंतु जेव्हा ती हॉटेलमधून बाहेर पडू लागली, तेव्हा मुलगा तिच्यासोबत नव्हता. पण तिच्याकडे एक मोठी ट्रॉली बॅग होती. सूचनाला पाहून हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला, मात्र तिने आपल्या मुलाला आधीच घरी पाठवल्याची माहिती दिली. सूचनाने हॉटेलमधून चेक आऊट केल्यानंतर कर्मचारी खोली साफ करण्यासाठी आले असता, तेथे रक्ताचे डाग पाहून त्यांना धक्काच बसला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
हेही वाचा – भारतीय पर्यटक गेले नाहीत, तर मालदीवचे काय होईल माहितीये?
पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ कारवाई केली. सूचना ज्या टॅक्सीतून हॉटेलमधून बाहेर पडली होती, त्या टॅक्सी चालकाचा फोन नंबर शोधून त्याला संपूर्ण प्रकरण सांगितले. पोलिसांशी झालेल्या संभाषणानंतर टॅक्सी चालकाने तिला कर्नाटकातील चित्रदुर्ग भागातील पोलीस ठाण्यात नेले आणि अशा प्रकारे सूचना पोलिसांच्या ताब्यात आली. तेथून नंतर गोवा पोलिसांनी चित्रदुर्ग गाठून महिलेला अटक केली. पोलिसांनी टॅक्सीमध्ये ठेवलेली बॅग उघडली, तेव्हा मुलाचा मृतदेह आढळून आला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुचनाने मुलाची हत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!