Bengali Actress Aindrila Sharma Death : बंगाली चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री एंड्रिला शर्मा हिचे निधन झाले आहे. २० नोव्हेंबर रोजी अनेक हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती चिंताजनक होती आणि आता एंड्रिलाने जगाचा कायमचा निरोप घेतला आहे.
एवढ्या लहान वयात एंड्रिलाने जगाचा निरोप घेतल्याने तिच्या सर्व चाहत्यांना धक्का बसला आहे. ती बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. एंड्रिलाला अनेक हृदयविकाराचा झटका आला होता. हृदयविकाराच्या झटक्यानंतर डॉक्टरांनी तिचे कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) देखील केले. मात्र, तची प्रकृती चिंताजनक होती.
हेही वाचा – NZ Vs IND 2nd T20 : ‘सुसाट’ सूर्यानं ठोकली सेंच्युरी..! टिम साऊदीची हॅट्ट्रिक; वाचा स्कोअर!
Bengali actor Aindrila Sharma passed away at the age of 24 in a private hospital in Howrah today after suffering multiple cardiac arrests last night.
(Photo source: Aindrila Sharma's Facebook page) pic.twitter.com/iIyKvxGevh
— ANI (@ANI) November 20, 2022
ভালো থেকো… #Aindrilasharma
আত্মার শান্তি কামনা করি |🙏🙏🙏My deepest condolences for her family & fans..
Stay strong #SabyasachiChowdhury no words can suffice the pain you are going through… pic.twitter.com/W9Vw6zfseg— Jeet (@jeet30) November 20, 2022
एंड्रिला शर्मा हिला १ नोव्हेंबर रोजी बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. असे सांगितले जात आहे की तिला १५ नोव्हेंबर रोजी मल्टिपल कार्डिअॅक अरेस्ट झाला होता, त्यानंतर तिची प्रकृती अधिकच बिघडली. ती व्हेंटिलेटरवर होती. हृदयविकाराच्या आधी तिला ब्रेन स्ट्रोकही आला होता, त्यामुळे तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या होत्या. ब्रेन स्ट्रोकनंतर, आता अनेक हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या पथकाने एंड्रिलाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण आजाराशी लढताना ती जीवनाची लढाई हरली.