Bank Strike 2023 : देशभरात २ दिवस बँकांचा संप..! ATM सह ‘या’ सर्व सेवांवर परिणाम

WhatsApp Group

Bank Strike 2023 : बँक जाणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. या महिन्याच्या अखेरीस तुमचेही बँकेशी संबंधित काही काम असेल तर तुम्ही ते आधीच निपटून काढा. २८ जानेवारी ते ३१ जानेवारी पर्यंत तुम्हाला बँकिंगचे काम हाताळण्यात त्रास होऊ शकतो. बँक युनियनने २ दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

४ दिवस त्रास का होऊ शकतो?

२८ जानेवारी हा महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. यासोबतच रविवार असल्याने २९ जानेवारीला देशभरातील बँका बंद राहणार आहेत. या सर्वांशिवाय बँक युनियनने ३० आणि ३१ जानेवारी रोजी संपाची घोषणा केली असून त्यामुळे ग्राहकांना ४ दिवस त्रास सहन करावा लागू शकतो. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (UFBU) ची बैठक मुंबईत पार पडली, ज्यामध्ये बँक संघटनांनी दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी बँक संघटना संपावर जात आहेत.

हेही वाचा – Auto Expo 2023 : फुलपाखरासारखे दरवाजे, बंदुकीच्या गोळीसारखा स्पीड, रेंज ५०० किमी..! बघा ‘ही’ शानदार कार

माहिती देताना, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी सांगितले की, युनायटेड फोरमची बैठक झाली असून, त्यात २ दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी सांगितले आहे की बँक युनियनची मागणी आहे की बँकिंगचे काम ५ दिवस झाले पाहिजे. यासोबतच पेन्शनही अपडेट करावी.

या मागण्याही पूर्ण कराव्यात…

यासोबतच एनपीएस रद्द करून पगारवाढीसाठी चर्चा करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याशिवाय सर्व संवर्गातील भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांसाठी युनियनने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सलग ४ दिवस ग्राहकांना त्रास होऊ शकतो

शनिवार आणि रविवारी बँकेला सुट्टी असते. यानंतर सोमवार आणि मंगळवारी बँकांचा संप असल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एटीएममधील रोकड संपण्याची समस्या ऐरणीवर येऊ शकते. यासोबतच चेक क्लिअरन्सबाबतही अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment