Bank Of Maharashtra Recruitment 2022 : बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने अपरेंटिस पदाच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या BOM रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया १३ डिसेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे. तर ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २३ डिसेंबर २०२२ आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या या भरती मोहिमेत एका वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांच्या एकूण ३१४ पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना संपूर्ण भरती अधिसूचना वाचण्याचा सल्ला दिला जातो.
रिक्त पदांची संख्या –
३१४ अपरेंटिस पदे
वयोमर्यादा –
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अपरेंटिस भरतीसाठी उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षे दरम्यान असावे.
हेही वाचा – Hyundai ची ‘नवी’ इलेक्ट्रिक कार..! एका चार्जमध्ये ६३१ Km धावणार; वाचा संपूर्ण माहिती!
अर्ज शुल्क –
बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी अनारक्षित, OBC, EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १५० रुपये निश्चित केले आहे. तर SC, ST उमेदवारांना फक्त १०० रुपये जमा करावे लागतील. याशिवाय दिव्यांग उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
अर्ज पात्रता –
बँक ऑफ महाराष्ट्र अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच शिकाऊ उमेदवारांना स्थानिक भाषेवरही प्रभुत्व असायला हवे.
स्टायपेंड –
बँक ऑफ महाराष्ट्र भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना ९००० रुपये प्रति महिना दराने स्टायपेंड दिला जाईल. हे स्टायपेंड एका वर्षासाठी दिले जाईल.
अर्ज कसा करावा?
- bankofmaharashtra.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- होम पेजवर दिसणार्या करिअर टॅबवर क्लिक करा.
- स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज भरा.
- अर्ज फी जमा करा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट बटण दाबा.
- भविष्यातील गरजांसाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.
Bank of Maharashtra Apprentice Recruitment Notification
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!