Bank of India Job 2024 : बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! जाणून घ्या सर्व डिटेल्स…

WhatsApp Group

Bank of India Job 2024 : बँकांमध्ये काम करणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. बँक ऑफ इंडियाने अधिकारी पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. तुम्हालाही बँकेत नोकरी करायची इच्छा असेल, तर तुम्ही Bankofindia.co.in वर जाऊन अर्ज करू शकता. या पदांसाठी 10 एप्रिलपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. तुम्हालाही या पदांसाठी अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करा.

पात्रता

बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडे CA/CMA/CS किंवा MBA/ समकक्ष पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असावा. उमेदवाराचे वय 1 फेब्रुवारी 2024 रोजी 23 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. कायदा अधिकारी पदांसाठी, उमेदवारांनी कायद्याची पदवी आणि वय 25 ते 35 वर्षे दरम्यान असावे. आयटी विभागातील पदांशी संबंधित भरतीसाठी, उमेदवाराकडे बीई बीटेक पदवी किंवा एमसीए किंवा संगणक विज्ञान आयटीमध्ये मास्टर असणे आवश्यक आहे आणि वयोमर्यादेबद्दल बोलायचे तर ते 25 ते 37 वर्षे असावे. बँकेमार्फत रिक्त असलेल्या 143 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे.

जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करणार आहेत, त्यांची निवड परीक्षेच्या गुणांकनाच्या आधारे केली जाईल. यासोबतच ऑनलाइन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीवरही ते अवलंबून असेल. ऑनलाइन परीक्षेत इंग्रजी भाषा, सामान्य जागरूकता, पोस्ट संबंधित आणि बँकिंग उद्योगाशी संबंधित प्रश्न विचारले जातील.

हेही वाचा – Mutual Fund : रिटायरमेंटनंतर पैसा हवाय, म्युच्युअल फंडाची ‘ही’ नवीन स्कीम येईल कामी!

अर्ज शुल्क

बँक ऑफ इंडिया फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांचे शुल्क श्रेणीनिहाय निश्चित करण्यात आले आहे. सामान्य आणि इतर श्रेणीतील उमेदवारांना 850 रुपये आणि SC/ST/PWD श्रेणीतील उमेदवारांना 175 रुपये भरावे लागतील. अर्ज फी भरण्यासाठी उमेदवार इंटरनेट बँकिंग, UPI, QR कोड इत्यादी वापरू शकतात.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment