Bank Holidays In June 2024 : जून महिना सुरू होणार आहे, त्यामुळे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते या महिन्याच्या सुरुवातीलाच पूर्ण करणे चांगले. प्रत्येक महिन्याप्रमाणे जूनमध्येही अनेक दिवस बँक सुट्ट्या असणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या जून बँक हॉलिडेजच्या पूर्ण यादीनुसार, बँका जूनमध्ये एकूण 12 दिवस बंद राहणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये एकूण 12 दिवस बँका काम करणार नाहीत. रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीय स्तरावर बँक सुट्ट्यांची ही यादी प्रसिद्ध केली आहे. विविध राज्यांमध्ये होणाऱ्या अनेक सणांच्या व्यतिरिक्त, या 12 दिवसांमध्ये शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश होतो.
1 जून – या दिवशी निवडणूक ठिकाणी बँका बंद राहतील.
2 जून – रविवारमुळे देशभरातील बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
8 जून – महिन्याच्या दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
9 जून – रविवारमुळे बँका बंद राहतील
16 जून – रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
22 जून – महिन्याच्या चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
23 जून – रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
30 जून – रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
10 जून – पंजाबमध्ये बँका बंद राहतील.
14 जून – ओडिशामध्ये बँका बंद राहतील.
15 जून – मिझोराम या ईशान्येकडील राज्यामध्ये YMA दिवस आणि ओडिशातील राजा संक्रांतीमुळे बँका बंद राहतील.
17 जून – बकरी ईदनिमित्त काही राज्ये वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
21 जून – वट सावित्री व्रतामुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.
हेही वाचा – Credit Score खराब झालाय, तर काळजी करू नका! या 5 प्रकारे झटपट वाढेल CIBIL, वाचा!
ऑनलाइन बँकिंग सुविधा उपलब्ध
बँकेला सुटी संपल्यानंतरही तुम्ही ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैशांचे व्यवहार करू शकता किंवा इतर कामे करू शकता. बँकांच्या सुट्यांचा या सुविधांवर कोणताही परिणाम होणार नाही. बँक बंद असताना, बँकेशी संबंधित अनेक कामे मोबाईल किंवा नेट बँकिंगद्वारे करता येतात. बँक बंद असताना सर्व ऑनलाइन सुविधा सुरू राहतील.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा