Bank Holidays : फेब्रुवारीत १० दिवस बँका बंद..! रिझर्व्ह बँकेची माहिती; वाचा सुट्टयांची लिस्ट!

WhatsApp Group

Bank Holidays : फेब्रुवारी महिना यायला अवघे काही दिवस उरले आहेत. फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस असतात त्यामुळे बँकेच्या शाखेत जाण्यापूर्वी या महिन्यात बँक किती दिवस बंद राहणार आहे हे जाणून घ्या. RBI च्या अहवालानुसार फेब्रुवारी महिन्यात २८ पैकी १० दिवस बँका बंद राहतील. कोणकोणत्या दिवशी बँकेत काम होणार नाही ते पाहूया…

RBIने यादी जारी केली

ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकांच्या सुट्ट्यांची यादी अगोदरच जारी केली जाते. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार, फेब्रुवारीमध्ये बँका १० दिवस बंद राहतील.

हेही वाचा – Konkan Railway : कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी गूड न्यूज..! ‘या’ ३७ स्थानकांचे होणार सुशोभीकरण

बँक सुट्ट्यांची यादी (फेब्रुवारी २०२३)

  • ५ फेब्रुवारी २०२३ – रविवारमुळे संपूर्ण भारतातील बँका बंद राहतील
  • ११ फेब्रुवारी २०२३ – दुसऱ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील
  • १२ फेब्रुवारी २०२३ – रविवारमुळे संपूर्ण भारतातील बँका बंद राहतील
  • १५ फेब्रुवारी २०२३ – लुई-न्गाई-नीमुळे इंफाळच्या बँका बंद राहतील
  • १८ फेब्रुवारी २०२३ – अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, हैदराबाद, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, तिरुवनंतपुरम येथे महाशिवरात्रीमुळे बँका बंद राहतील.
  • १९ फेब्रुवारी २०२३ – रविवारमुळे भारतभरातील बँका बंद राहतील
  • २० फेब्रुवारी २०२३ – रोजी राज्य दिनानिमित्त आयझॉलमध्ये बँका बंद राहतील.
  • २१ फेब्रुवारी २०२३ – लोसारमुळे गंगटोकमध्ये बँका बंद राहतील
  • २५ फेब्रुवारी २०२३ – चौथ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील
  • २६ फेब्रुवारी २०२३ – रविवारमुळे भारतभरातील बँका बंद राहतील

ऑनलाइन सुविधांचा लाभ घेता येईल

बँकेच्या सुट्ट्यांमुळे तुम्ही ऑनलाइन सुविधांचा लाभ घेऊ शकता. म्हणजेच सुट्टीच्या दिवशीही तुम्ही ऑनलाइन बँकिंगद्वारे पैशांचे व्यवहार करू शकता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment