Bajaj Pulsar कायमची बंद..! २० वर्षांची साथ तुटली; ‘नव्या’ बाइकनं घेतली जागा

WhatsApp Group

Bajaj Pulsar 150 Discontinued : बजाजला हिट बनवण्यात पल्सर (Pulsar) बाइकचा मोठा वाटा आहे. कंपनीसाठी ही सर्वाधिक विक्री होणारी बाइक देखील आहे. कंपनीने पल्सरमधील वेगवेगळ्या इंजिनांना अनेक पर्याय दिले. यामुळेच या बाइकची विक्रीही जास्त झाली होती. मात्र, आता कंपनीने पल्सर १५० बाइक कायमची बंद केली आहे. बजाजच्या नवीन Pulsar P150 ने आता या बाइकची जागा घेतली आहे. पल्सर १५० च्या यशानंतर कंपनीने नोव्हेंबर २०२२ मध्ये पल्सर पी १५० लाँच केली. कंपनीने ऑगस्ट २०२२ मध्ये पल्सर १८० बंद केली आहे. तर, पल्सर २२० चे उत्पादन २०२१ मध्ये बंद करण्यात आले.

बजाज पल्सर १५० चा प्रवास

८० आणि ९० च्या दशकात बजाजने स्कूटर सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवले. पण नंतर परवडणाऱ्या १०० CC कम्युटर बाइकने बजाजच्या स्कूटर्सचे बजाज पूर्णपणे बदलून टाकले. बाइकचा वेग स्कूटरपेक्षा जास्त होता. तसेच, त्याचे मायलेज अधिक चांगले होते. त्यानंतर कंपनीने बाइक सेगमेंटमध्ये आपली उपस्थिती प्रस्थापित करण्यासाठी पल्सर १५० आणि पल्सर १८० लाँच केली. दोन्ही बाइक्स त्यांच्या उत्कृष्ट लूकमुळे बाजारात झटपट हिट ठरल्या. ज्यांना बाइक घेण्याची इच्छा आहे अशा लोकांचे लक्ष याने पटकन वेधून घेतले.

हेही वाचा – IND Vs BAN : विराट..तूच किंग रे! सहज SIX ठोकत साजरं केलं शतक; पाहा Video

गेल्या २० वर्षात कंपनीने पल्सर १५० मध्ये अनेक बदल करून नेक्स्ट जनरेशन बाईक लॉन्च केली. पहिल्या पिढीतील पल्सर १५० मध्ये १२ bhp ची कमाल शक्ती असलेले इंजिन होते, जे ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले होते. २००३ मध्ये बाइकला एक मोठे अपडेट मिळाले. त्यानंतर कंपनीने डीटीएस-आय डिजिटल ट्विन स्पार्क इग्निशन तंत्रज्ञानासह इंजिन लाँच केले. त्यामुळे बाइक मजबूत झाली. तसेच, इंधन कार्यक्षमता वाढली. पल्सर १५० लोकप्रिय करण्यात नायट्रोक्स रिअर सस्पेंशनचीही भूमिका होती. त्यानंतर या वैशिष्ट्यांसह त्याच्या विभागातील ही एकमेव बाइक होती.

सध्या पल्सर १५० इंजिन जास्तीत जास्त १४ पीएस पॉवर आणि १३.२५ एनएम कमाल टॉर्क जनरेट करते. या बाइकमध्ये वुल्फ-आयड हेडलॅम्प, कार्बन फायबर अॅक्सेंट आणि डॅगर-एज ग्राफिक्स आहेत. मात्र, आता पल्सर १५० ची जागा पल्सर पी १५० ने घेतली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment