Ayushman Bharat Card : केंद्र सरकारने 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही आयुष्मान योजनेत आणण्याची घोषणा केली आहे. कुटुंबात 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे दोन व्यक्ती असतील तर 5 लाख रुपयांचा विमा शेअर केला जाईल. यासाठी सरकार लवकरच संपूर्ण योजना आणणार आहे.
वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या ओझ्यातून लोकांना दिलासा देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने 2018 च्या अर्थसंकल्पात आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत कार्डधारकाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा दिली जाते. या कार्डवर तुम्ही कोणत्याही खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकता.
केंद्र सरकारची घोषणा
सरकारच्या या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे आयुष्मान भारत योजनेंतर्गत 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कव्हर करण्याचा निर्णय आहे. हा एक मोठा निर्णय आहे. या निर्णयामागे मानवतावादी विचार आहे.
या निर्णयानंतर 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती, मग तो गरीब, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय असो, ज्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!