प्रत्येकाला खरेदी करायचीय अयोध्येत जमीन, प्रॉपर्टीचे दर ऐकाल तर…

WhatsApp Group

रामनगरी अयोध्येत श्रीरामाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेला मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित राहणार आहेत. सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर अयोध्या चर्चेत आहे. राम मंदिराच्या उभारणीचा अयोध्येतील प्रत्येक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम झाला आहे. याचा परिणाम अयोध्येच्या रिअल इस्टेट मार्केटवरही (Ayodhya Real Estate Prices) झाला आहे. अयोध्येतील जमिनी आणि मालमत्तेच्या किमती चार पटीने वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशातील मोठ्या शहरांच्या तुलनेत अयोध्येत मालमत्तेच्या किमती वेगाने वाढत आहेत.

ही तेजी अजूनही थांबणार नसल्याचे प्रॉपर्टी मार्केटच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बाह्य गुंतवणूकदारांसोबत स्थानिक खरेदीदारही मालमत्तांमध्ये गुंतवणूक करत आहेत. ताज आणि रॅडिसन सारख्या बड्या हॉटेल चेन देखील येथे जमीन खरेदी करण्यास इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे अनेक बड्या रिअल इस्टेट कंपन्यांचीही नजर अयोध्येवर आहे.

मनीकंट्रोलच्या एका अहवालात अॅनारॉकच्या संशोधनाचा हवाला देत अयोध्येतील राम मंदिराच्या आसपासच आणि अयोध्येच्या बाहेरील भागातही जमिनीच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे म्हटले आहे. उदाहरणार्थ, फैजाबाद रोड परिसरातील हा दर 2019 मध्ये ₹ 400-700 प्रति चौरस फूट होता. जो ऑक्टोबर 2023 पर्यंत ₹ 1,500-3,000 प्रति चौरस फूट वाढला. अयोध्या शहरातील जमिनीच्या सरासरी किमती 2019 मध्ये प्रति चौरस फूट ₹ 1,000-2,000 वरून सध्या ₹ 4,000-6,000 प्रति चौरस फूट वाढल्या आहेत.

हेही वाचा – टी-20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, 9 जूनला भारत-पाक लढत!

मालमत्तेच्या किमतींमध्ये झालेली ही वाढ अयोध्येच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये खरेदीदार आणि गुंतवणूकदारांची सतत वाढत जाणारी स्वारस्य आणि विश्वास दर्शवते. अयोध्येचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन गुंतवणूकदार आता या शहराला रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी सर्वात फायदेशीर ठिकाण मानत आहेत. मोठे विकासक आणि हॉटेल चेन येथे जागा शोधत आहेत.

अभिनंदन लोढा हाऊस जानेवारीमध्ये अयोध्येत 25 एकर, निवासी, भूखंड विकास प्रकल्प सुरू करण्याची योजना आखत आहे. ताज आणि रॅडिसन सारख्या मोठ्या हॉटेल चेन देखील येथे मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत आहेत. शहरातील पायाभूत सुविधांमध्ये झालेली सुधारणा आणि अयोध्येला जगातील प्रमुख धार्मिक स्थळ बनवण्यासाठी सरकारकडून उचलण्यात येत असलेली पावले यामुळेही सर्वांचे लक्ष अयोध्येकडे लागले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment