Ayodhya Ram Mandir : राम मंदिर कधी पूर्ण होणार? रामाची मूर्ती कशी असणार? जाणून घ्या!

WhatsApp Group

Ayodhya Ram Mandir : रामनगरी अयोध्येत बनवल्या जाणार्‍या जगातील सर्वात दिव्य आणि भव्य रामलला मंदिराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आजपासून बरोब्बर एक वर्ष आधी म्हणजेच २०२४ च्या मकरसंक्रांतीच्या दिवशी मंदिरात रामाच्या बालस्वरूपाच्या मूर्तीचा अभिषेक केला जाणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ऑक्टोबर २०२३ पर्यंत मंदिराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण होईल. २०२३ मकरसंक्रातीपर्यंत, भगवान श्रीरामाची मंदिराच्या गर्भगृहात प्राण प्रतिष्ठा होईल. ते म्हणाले की, आतापर्यंत केलेल्या तयारीनुसार १ जानेवारी २०२४ ते १४ जानेवारी २०२४ दरम्यान प्राणप्रतिष्ठेचे काम करण्याचे नियोजन आहे.

माध्यमांना माहिती देताना चंपत राय म्हणाले की, मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या मजल्याचे बांधकाम ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर मंदिराच्या गर्भगृहात बालस्वरूपातील रामाची मूर्ती बसवण्यात येणार आहे.

आतापर्यंत जवळपास ६० टक्के बांधकाम पूर्ण

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर निश्चित कालमर्यादेपूर्वी तयार होईल. मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ६० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, जानेवारी २०२४ मध्ये मंदिराच्या गर्भगृहाचे काम पूर्ण होऊन देवतेची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. पण तुमच्या मनात एक प्रश्न जरूर चालू असेल की गर्भगृहात भगवान श्रीरामाची मूर्ती कशी विराजमान असेल? ते कोणत्या स्वरूपात असेल?

हेही वाचा – Mahindra XUV700 : महिंद्राकडून ‘धाकड’ व्हेरिएंट लाँच..! किंमत फक्त १३.९५ लाख; जबरदस्त फीचर्स!

खरे तर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या इमारत बांधकाम समितीची बैठक दर महिन्याला होते आणि बैठकीत छोट्या-छोट्या बाबींचा अभ्यास केला जातो. या बैठकीत प्रभू श्रीरामाच्या रूपाबाबत चर्चा झाली, ज्यामध्ये भक्तांना ३० ते ३५ फूट अंतरावरून आपल्या देवतेचे दर्शन घेता येईल, असा निर्णय घेण्यात आला. याशिवाय रामललाची मूर्ती ५ ते ७ वयोगटातील बालकाच्या रूपात असेल. त्यासोबतच त्या मूर्तीमध्ये बोटे, चेहरा आणि डोळे कसे असावेत यावर देशातील नामवंत मूर्तिकारांनी मंथन सुरू केले आहे. तथापि, ट्रस्टनुसार, भगवान श्रीरामाची मूर्ती ८.५” फूट उंच असेल, जी तयार करण्यासाठी ५ ते ६ महिने लागतील.

‘नीलंबुजश्यामलकोमलंगन’च्या धर्तीवर रामाची मूर्ती बनवण्यात येणार आहे. “श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट” चे सरचिटणीस “चंपत राय” म्हणतात की, निलंबुजश्यामलकोमलांगच्या धर्तीवर देवाच्या मूर्तीचे स्वरूप तयार केले जाईल. असा दगड मूर्तीसाठी निवडला जाईल, जो आकाशी रंगाचा असेल. यासोबतच महाराष्ट्र आणि ओरिसा येथील शिल्पकलेच्या अभ्यासकांनी असा दगड आपल्याकडे उपलब्ध असल्याची ग्वाही दिली आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त शिल्पकार मूर्तीचा आकार बनवणार आहेत. ज्यामध्ये ओडिशाचे सुदर्शन साहू, तसेच वासुदेव कामत आणि कर्नाटकचे रमैय्या वाडेकर हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत. ट्रस्टने या मूर्तीकारांना मूर्तीचा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment