मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ‘ब्रह्मास्त्र’च्या निर्मात्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ब्रह्मास्त्र बनवण्याचा कल्पनेपासून बनवण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीनंच याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. व्हिडिओची सुरुवात एका सीननं होते ज्यामध्ये रणवीर फायरबॉलचा शॉट घेताना दिसत आहे. त्याच्या बाजूला २०१६ हे वर्ष लिहिलं आहे. त्याच वेळी, पुढच्या सीनमध्ये २०२२ हे वर्ष लिहिलं आहे आणि रणबीरचं बदललेला रुप दिसतं. मग अयान ‘ब्रह्मास्त्र’चा प्रवास सांगतो.
‘ब्रम्हास्त्र’ बनवण्याची आयडिया कशी सुचली?
अयान मुखर्जी म्हणतो, “ब्रह्मास्त्राचा प्रवास २०११ सालापासून झाला, जेव्हा मी हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये शिमल्यात होतो. माझा पहिला चित्रपट (वेकअप सिड – २००९) प्रदर्शित झाला. आणि मी माझ्या दुसऱ्या चित्रपटाच्या (ये जवानी है दिवानी – २०१३) स्क्रिप्टवर काम करत होतो. आपल्या पर्वतांमध्ये जी ऊर्जा आहे, जी अध्यात्म जाणवते त्याचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला.”
हेही वाचा – ….तेव्हा शाहरुख खानच्या प्रॉडक्शन कंपनीच्या गेटवरून संतोष जुवेकरला हाकलवण्यात आलं!
अयान पुढं म्हणतो, “ब्रह्मास्त्राच्या दर्शनाचा जन्म त्या ऊर्जेतून झाला आहे, असा माझा विश्वास आहे.” यादरम्यान, ‘ब्रह्मास्त्र’च्या टायटल लोगोसाठी प्रथम किती कलाकृती केल्या गेल्या आणि त्यापैकी कोणत्याची निवड करण्यात आली हे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. अयान म्हणतो, “सुरुवातीपासूनच, या चित्रपटाद्वारे आपल्या देशात यापूर्वी कधीही न पाहिलेला सिनेमा बनवण्याचा विचार होता.”
“आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर”
अयान मुखर्जी पुढे म्हणतो, “या चित्रपटात आपण एक पूर्णपणे वेगळे, नवीन, न पाहिलेले जग निर्माण करू. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून. पण या चित्रपटाचा पाया हा आपली संस्कृती, पौराणिक कथा आणि भारतातील अध्यात्म यांच्यापासून प्रेरित असायला हवा. ‘ब्रह्मास्त्र’ची कथा इतकी अफाट होती की ती एका चित्रपटात बसू शकत नाही, म्हणून मी ठरवले की हा चित्रपट तीन भागात असेल. या सगळ्याचा विचार झाला. पण आता चित्रपट कसा बनवायचा?”
हेही वाचा – डॉक्टरांनी ‘तिला’ सांगितलं फक्त चरबी जमा झालीय, पण निघाला ‘असा’ आजार! पाहा PHOTO
अयान पुढे म्हणाला, “माझ्या मनात जे सीन सुरू होते ते पडद्यावर कसे आणायचे? मला चित्रपट निर्मितीची नवीन पद्धत शिकावी लागली. मला खूप संशोधन करावं लागलं आणि नंतर मला समजलं की व्हिज्युअल इफेक्ट्स आणि स्केल आणि त्यासाठी लागणारे बजेट यापूर्वी कोणत्याही भारतीय चित्रपटाला मिळालं नव्हतं. पण मला पूर्ण विश्वास होता की या सर्व गोष्टींवर मात करून ‘ब्रह्मास्त्र’ योग्य मार्गानं बनवला तर हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीसाठी खूप मोठी उपलब्धी ठरेल.”