

Mahindra Thar vs Maruti Jimny : मारुती सुझुकी जिम्नीची भारतात खूप प्रतीक्षा होती. ऑटो एक्सपो २०२३ (Auto Expo 2023) मध्ये ही प्रतीक्षा संपवून मारुतीने जिम्नी एसयूव्हीचे अनावरण केले. बाजारपेठेत त्याची स्पर्धा महिंद्रा थारशी होईल, जी त्याच्या विभागात राज्य करत आहे. तथापि, मारुती सुझुकी जिम्नी ५-दरवाज्यांच्या व्हेरिएंटमध्ये आणली गेली आहे तर सध्याची थार ३-दरवाज्याच्या व्हेरिएंटमध्ये आहे. तथापि, अहवालानुसार, महिंद्रा ५ दार असलेली थार देखील लॉन्च करणार आहे. पहिल्या चाचणी दरम्यान देखील हे दिसून आले आहे. म्हणजेच आगामी काळात मारुती सुझुकी जिम्नी आणि महिंद्रा थार (५-दार असलेली) यांच्यात खडतर स्पर्धा होऊ शकते. मारुती सुझुकी जिम्नीच्या किमती अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत परंतु त्याची किंमत सुमारे १० लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या कंपनीने त्याचे बुकिंग सुरू केले आहे.
फीचर्स, इंजिन
आंतरराष्ट्रीय बाजारात विकली जाणारी मारुती सुझुकी जिम्नीचे (५-दार असलेले) व्हेरिएंट बहुतेक लोकांनी पाहिली असेल, जिम्नीचे ५-दरवाजा व्हेरिएंट जे भारतात आणले गेले आहे, ते मोठ्या प्रमाणात ३-दरवाजा व्हेरिएंटच्या डिझाइनसह येते. मात्र, ५ दरवाजा व्हर्जनमध्ये आणण्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. ही पाच सीटर आहे आणि त्याची लांबी ३९८५ मिमी, रुंदी १६४५ मिमी आणि उंची १७२० मिमी आहे. त्याची ग्राउंड क्लीयरन्स २१० मिमी आहे. त्याचा अप्रोच एंगल ३६ डिग्री आहे, रॅम्प ब्रेक-ओव्हर अँगल २४ डिग्री आहे आणि डिपार्चर अँगल ५० डिग्री आहे. हे 4X4 सह आणले आहे. म्हणजेच एकूणच ती गाडी एक उत्तम ऑफरोडर असू शकते.
#AutoExpo2023: Maruti Suzuki unveils 5-door offroader Jimny at #AutoExpo2023 @Maruti_Corp pic.twitter.com/KI4s3TqHO6
— Asianet Newsable (@AsianetNewsEN) January 12, 2023
Maruti Suzuki Jimny 5-door makes global debut in India. Excited? 🥵 pic.twitter.com/fISuHUbznx
— Parth Gohil (@Parth_Go) January 12, 2023
हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : राम मंदिर कधी पूर्ण होणार? रामाची मूर्ती कशी असणार? जाणून घ्या!
यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, ९.०-इंचाची स्मार्ट प्ले प्रो+ इन्फोटेनमेंट सिस्टीम, अर्कामीस सराउंड साउंड सिस्टीम, ६ एअरबॅग्ज, ब्रेक लिमिटेड स्लिप डिफरेंशियल (एलएसडी), हिल होल्ड असिस्टसह ईएसपी, हिल डिसेंट कंट्रोल, ईबीडीसह एबीएस आणि रीअरव्ह्यू मिरर आहेत. कॅमेरा सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. हे १.५-लिटर चार-सिलेंडर K15C ड्युअलजेट पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे, जे आम्ही पूर्वी Ertiga, XL6 आणि Brezza मध्ये पाहिले आहे. त्याला माइल्ड-हायब्रीड प्रणाली देण्यात आली आहे. इंजिन १०४.८ PS पॉवर आणि १३४.२ Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ४-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर देण्यात आले आहेत.