Australian woman jailed on 100th birthday : जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक ‘बकेट लिस्ट’ असते. या लिस्टमध्ये आपण जगताना ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सर्वांचा समावेश करतो. अशा लिस्टसाठी, लोक कधीकधी विचित्र विचार करतात, जे त्यांना आयुष्यात फक्त एकदाच करायचं असतं. या गोष्टींमध्ये स्कायडायव्हिंगसारख्या रोमांचक गोष्टींचाही समावेश असू शकतो, परंतु एक इच्छा अशी आहे, जी वाचल्यावर तुम्हीही थक्क व्हाल. एका आजीनं तुरुंगात जाण्याची म्हणजेच अटक होण्याची इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे तिची इच्छा १००व्या वर्षी पूर्ण झाली आहे.
ऑस्ट्रेलियातील एका महिलेला तिच्या १००व्या वाढदिवशी विचित्र कारणास्तव पोलिसांनी अटक केली. ही अटक संबंधित महिलेल्या बकेट लिस्टचा भाग होती. या बकेट लिस्टमध्ये इच्छा जोडण्यासाठी कोणतंही वय नसतं आणि जीन बिक्टन (Jean Bickenton) यांनी ते सिद्ध केले. त्यांनी आपला वाढदिवस अतिशय नाट्यमय पार्टीनं साजरा केला. पोलीस अधिकाऱ्यांनी समारंभात व्यत्यय आणून या महिलेला अटक केली, त्यामुळं महिलेची इच्छा पूर्ण झाली. व्हिक्टोरियाच्या पोलिसांनी त्यांच्या फेसबुक पेजवर या अटकेबद्दल पोस्ट देखील शेअर केली आहे.
https://www.facebook.com/victoriapolice/posts/437777371708664
हेही वाचा – टायरचा रंग काळाच का असतो? पांढरे, हिरवे, निळे असे का नसतात? घ्या जाणून!
काय म्हणाले पोलीस?
पोलिसांनी फेसबुकवर म्हटलं, “आता अशा प्रकारची अटक करण्यात आम्हाला आनंद होत आहे. अनेकांसाठी, अटक न करता जीवन जगणं ही एक चांगली धावपळ आहे. जेव्हा माजी परिचारिका जीन बिक्टन यांची इच्छा ऐकली, तेव्हा आम्ही ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करण्यास तयार झालो. त्यांच्या पार्टीत तीन तरुण पोलीस सायरन घेऊन फिरत होते. पोलिसांनी तिला बेड्या घातल्या आणि बिक्टन यांनीही ‘अधिकृतपणे’ अटक झाल्याचे घोषित केले. त्यांनी विरोध केला नाही.”
अटक झालेल्या बिक्टन म्हणाल्या, ”लोकांना हे सगळं वेगळं वाटेल, पण माझी इच्छा होती, की मी मरण्यापूर्वी एकदा मला पोलिसांनी अटक करावी, माझ्या बकेट लिस्टमध्ये त्याचा समावेश होता.” काही वेळानं पोलिसांनी बिक्टन यांना सोडून दिलं. महिलेच्या नाट्यमय अटकेची कहाणी सध्या सोशल मीडियावर चांगलीच पसंत केली जात आहे.