David Warner Century Record In Marathi : ऑस्ट्रेलियाचा घातक सलामीवीर फलंदाज डेव्हि़ड वॉर्नरने वर्ल्डकपमध्ये धडाका कायम राखला आहे. वॉर्नरने नेदरल़ँड्सविरुद्धच्या (AUS vs NED) सामन्यात जबरदस्त शतक ठोकले. वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) खराब सुरुवात केलेली ऑस्ट्रेलिया स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यावर भीतीदायक खेळत आहे. मागील सामन्यात पाकिस्तानविरुद्ध दीडशतक केलेल्या वॉर्नरने डच गोलंदाजांही समाचार घेतला आणि वर्ल्डकपमध्ये सहावे शतक ठोकले. यासह वॉर्नरने अनेक विक्रम मोडित काढले.
वॉर्नरने ऑस्ट्रेलियाचा महान कप्तान रिकी पाँटिंगलाही मागे टाकले, तर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी साधली. वॉर्नरने 93 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांसह 104 धावा केल्या. व्हॅन बीकने त्याला बाद केले.
हेही वाचा – दुष्काळात सापडलेत कोल्हापूरचे शेतकरी, रब्बी पिकांचे पेरणीचे क्षेत्र घटणार!
वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतके
- 7 – रोहित शर्मा
- 6 – सचिन तेंडुलकर
- 6 – डेव्हिड वॉर्नर*
- 5 – रिकी पाँटिंग
- 5 – कुमार संगकारा
Playing 11
नेदरलँड्स : विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीड, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!