Asian Games 2023 : भारताने एशियन गेम्स 2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवत तिसरे सुवर्ण जिंकले. घोडेस्वारी ड्रेसेज (Equestrian Dressage) स्पर्धेत अनुष अग्रवाल, हृदय विपुल चेडा आणि दिव्यकीर्ती सिंग यांनी हे सुवर्ण जिंकले. यादरम्यान संघाने 209.205 गुण मिळवले. विशेष म्हणजे भारताने तब्बल 41 वर्षांनंतर घोडेस्वारीत सुवर्णपदक जिंकले आहे.
यासह एशियन गेम्स 2023 (Asian Games 2023) मध्ये भारताच्या एकूण पदकांची संख्या 13 झाली आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 6 कांस्यपदक जिंकले आहेत. पदकतालिकेत भारतीय संघ हाँगकाँगनंतर सहाव्या स्थानावर आहे. चीन 45 सुवर्ण, 23 रौप्य आणि 10 कांस्य गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण कोरिया 41 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा – Viral Video : रस्त्यावर पडलेले हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी!
नेहा ठाकूरने रौप्य पदकाने भारतासाठी दिवसाची सुरुवात केली. सेलिंगमध्ये तिने हे पदक जिंकले. तिसरा दिवस भारतासाठी आतापर्यंत संमिश्र ठरला आहे. नेमबाजी आणि तलवारबाजी या दोन्ही प्रकारात भारताला पदक जिंकता आले नाही.
दिव्यांश सिंग पनवार आणि रमिता यांना 10 मीटर एअर रायफल मिश्र स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत कोरियाकडून (18-20) पराभव पत्करावा लागला, तर महिलांच्या सेबर उपांत्यपूर्व फेरीत स्टार तलवारबाज भवानी देवीला चीनच्या शाओ युकीकडून 7-15 असा पराभव पत्करावा लागला.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
हॉकी संघाचा 16-1 ने विजय!
मात्र, भारतीय पुरुष हॉकी संघाने सिंगापूरवर 16-1 असा शानदार विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. इतर स्पर्धांमध्ये, महिला स्क्वॉश सांघिक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभूत केले, तर 4×100 मीटर मेडले संघाने जलतरणात अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आणि या स्पर्धेत सर्वोत्तम वेळेसाठी एक नवीन भारतीय विक्रम प्रस्थापित केला.
त्यानंतर सचिन सिवाचनेही विजयी सुरुवात करून इंडोनेशियाच्या असीर उद्दीनचा मोठ्या फरकाने पराभव करत फेरीच्या 16 मध्ये प्रवेश केला. हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण 12 पदके (दोन सुवर्ण, चार रौप्य आणि सहा कांस्य) जिंकली आहेत.