Asian Games 2023 : पुण्याच्या मराठी पोरीनं रचला इतिहास, 42 वर्षाच्या बोपण्णाची लाभली साथ!

WhatsApp Group

Asian Games 2023 : चीनमधील हांगझोऊ येथील 19व्या एशियन गेम्स 2023 मध्ये भारताची सुवर्ण सुरुवात झाली. टेनिसमध्ये साकेत मिनेनी आणि रामनाथन रामकुमार यांच्या रौप्यपदकानंतर मिश्र दुहेरीत 42 वर्षीय रोहन बोपण्णा आणि पुण्याच्या मराठमोळ्या ऋतुजा भोसले या जोडीने जबरदस्त कामगिरी केली. बोपण्णा आणि ऋतुजा जोडीने अंतिम सामन्यात चायनीज तैपेई जोडीचा 2-6, 6-3, 10-4 असा पराभव केला. सामना टायब्रेकरवर गेला आणि अखेरीस भारतीय जोडीने रोमहर्षक विजयाची नोंद केली. या खेळांमधील भारताचे हे 9वे सुवर्णपदक ठरले. तर एकूणच हे 35 वे सुवर्ण ठरले.

बोपण्णा आणि ऋतुजा जोडीने एन शो लिआंग आणि संग हाओ हुआंग यांचा पराभव करून देशासाठी स्पर्धेत 9वे सुवर्ण जिंकले. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताला पहिल्या सेटमध्ये 2-6 ने पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर भारतीय जोडीने शानदार पुनरागमन केले. दुसरा सेट बोपण्णा-ऋतुजाने जिंकला आणि तिसरा सेट टायब्रेकरवर पोहोचला. यासह भारताने हा सामना टायब्रेकरमध्ये 10-4 असा जिंकून देशाच्या खात्यात सुवर्णपदक जमा केले.

हेही वाचा – EPFO Higher Pension : कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी, डेडलाईन वाढवली!

पदकतालिकेची स्थिती (Asian Games 2023)

भारत अजूनही या पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत एकूण 9 सुवर्ण, 13 रौप्य आणि 13 कांस्यपदक जिंकले आहेत. यजमान चीन 106 सुवर्ण, 65 रौप्य आणि 33 कांस्य पदके जिंकून अव्वल स्थानावर आहे. तर 28 सुवर्णांसह जपान आणि 27 सुवर्णांसह दक्षिण कोरिया अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

भारतीय संघाने या वर्षात आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. महिला क्रिकेट संघाचे सुवर्णपदक आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. आता भारतीय खेळाडू मागील आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरीला मागे टाकू शकतात की नाही हे पाहायचे आहे. भारताने 2018 मध्ये झालेल्या आशियाई खेळांमध्ये 570 खेळाडू पाठवले होते ज्यांनी 36 खेळांमध्ये भाग घेतला होता. त्या वर्षी भारताने 16 सुवर्ण, 23 रौप्य आणि 31 कांस्य पदके जिंकली होती. त्या वर्षी पदकतालिकेत भारत आठव्या स्थानावर होता.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment