Asia Cup 2023 Final : रोहित शर्माने ट्रॉफी रघूच्या हातात दिली, कोण आहे तो?

WhatsApp Group

Raghu In Indian Cricket Team : आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा (Asia Cup 2023 Final IND vs SL) पराभव करून आठव्यांदा विजेतेपद पटकावण्यात यश मिळविले. या सामन्यात भारतीय संघाची एकतर्फी कामगिरी पाहायला मिळाली. संघाच्या या शानदार कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मानेही आपल्या एकाच पाऊलाने सर्वांची मने जिंकली. आशिया चषक ट्रॉफी हातात घेतल्यानंतर, रोहितने ती सेलिब्रेशनदरम्यान टीमच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्य रघू ​​राघवेंद्रला दिली.

ट्रॉफीसोबत सेलिब्रेशन करताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने हातवारे करत रघुला स्टेजवर बोलावले. यानंतर त्याने रघुला ट्रॉफी दिली आणि सर्व खेळाडूंसोबत त्याने या विजेतेपदाचा आनंद साजरा केला. रघू हा सपोर्ट स्टाफमधील अशा सदस्यांपैकी एक आहे जो अनेकदा पडद्यामागे आपले काम करताना दिसतो.

कोण आहे रघू?

राघवेंद्र उर्फ ​​रघूबद्दल बोलायचे तर, तो एक थ्रो डाउन स्पेशालिस्ट आहे. रघू नेट प्रॅक्टिस दरम्यान वेगवान बॉल फेकण्याचे काम करतो, जेणेकरून फलंदाज वेगवान गोलंदाजांविरूद्ध स्वत: ला तयार करू शकेल. 2011-12 मध्ये ऑस्ट्रेलियन दौऱ्यात रघुने टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये प्रवेश केला होता. यानंतर, 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला पुन्हा सपोर्ट स्टाफमध्ये समाविष्ट करण्यात आले आणि आतापर्यंत तो संघाचा एक भाग आहे.

हेही वाचा – Viral Video : शिवीगाळ करणाऱ्या BJP नेत्याच्या कानाखाली मारली! महिलेचा व्हिडिओ व्हायरल

टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये रघुचा समावेश करण्याचे श्रेय सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडला जाते. रघू बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत असताना त्याने सचिन आणि द्रविडला सराव दिला. यानंतर या दोघांच्या शिफारसीमुळे रघुला सपोर्ट स्टाफचा भाग बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.

रविवारी खेळल्या गेलेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजच्या झंझावाती गोलंदाजीपुढे संपूर्ण संघ गारद झाला आणि अवघ्या 50 धावांत संपूर्ण संघ आटोपला. टीम इंडियाचे सलामीवीर फलंदाज शुबमन गिल आणि इशान किशन यांनीच हे आव्हान पूर्ण केले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment