फिनटेक कंपन्यांसाठी सध्याची वेळ काही चांगली दिसत नाही. पेटीएमनंतर आता भारतपे कंपनी संकटात सापडली आहे. कॉर्पोरेट मंत्रालयाने भारतपेला नोटीस (Bharat Pe Notice) बजावली आहे. मंत्रालयाने कंपनी कायद्याच्या कलम 206 अंतर्गत नोटीस जारी केली आहे आणि अशनीर ग्रोव्हर प्रकरणात भारतपेकडून माहिती मागवली आहे. तपासात सरकारला पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
मनीकंट्रोलच्या म्हणण्यानुसार, कॉर्पोरेट मंत्रालयाने भारतपेला नोटीस बजावली आहे की अशनीर ग्रोवरविरुद्ध (Ashneer Grover) न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी आणि दिवाणी प्रकरणांशी संबंधित पुरावे काय आहेत. अशनीर ग्रोवरने भारतपेची स्थापना केली होती. नंतर, अशनीर आणि त्याच्या पत्नीवर कंपनीच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यांना कंपनीच्या संचालक मंडळातून काढून टाकण्यात आले.
कंपनीने काय म्हटले?
नोटीसवर, भारतपे यांनी उत्तर दिले आहे, की मंत्रालयाने कंपनीला नोटीस बजावली आहे आणि अशनीर प्रकरणात अधिक माहिती मागवली आहे. सरकारने 2022 मध्ये या प्रकरणाचा आढावा सुरू केला होता आणि ही चौकशी पुढे नेत असताना अतिरिक्त माहिती मागवली होती. आम्ही तपास यंत्रणांना शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करू, असे कंपनीने म्हटले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
भारतपेची सुरुवात अशनीर ग्रोव्हरने 4 वर्षांपूर्वी केली होती. 2022 च्या सुरुवातीला अशनीर विरुद्धचा वाद सुरू झाला. त्याने कोटक ग्रुपच्या एका कर्मचाऱ्याला Nykaa IPO न दिल्याने धमकावले. वाद वाढत असताना ग्रोव्हर यांनी भारतपेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला. यानंतर कंपनीने अशनीरविरुद्ध आर्थिक हेराफेरीबाबत ऑडिटही सुरू केले.
हेही वाचा – शरद पवारांची ‘राष्ट्रवादी’ अजित पवारांची कशी झाली?
कंपनीकडून खटला दाखल
ऑडिटनंतर कंपनीने दिवाणी न्यायालयात अशनीरविरुद्ध खटला दाखल केला. त्यात बनावट बिले आणि कंपनीच्या निधीचा गैरवापर झाल्याचा दावा करण्यात आला होता. याशिवाय, अशनीरने भारतपे बनवण्यात कोणत्याही प्रकारे हातभार लावला नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीचा दावा आहे की अशनीरने 2018 मध्ये फक्त 31,920 रुपये गुंतवले होते, ज्याच्या बदल्यात त्याला 3,192 शेअर्स मिळाले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!