जगभरात कमाईच्या बाबतीत अॅप्पल दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. अॅप्पल प्रत्येक मिनिटाला 3.58 कोटी रुपये कमावते. ही कंपनी 1976 मध्ये स्टीव्ह जॉब्स आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी सुरू केली होती. तेव्हापासून आजपर्यंत अॅप्पलने कमाईच्या बाबतीत अनेक मजबूत रेकॉर्ड केले आहेत. सध्याच्या घडामोडीबद्दल बोलायचे झाले तर, अॅप्पल कंपनीची संपत्ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क आणि जेफ बेझोस यांच्यापेक्षा जास्त आहे. अॅप्पलचा लोगोही (Apple Logo Story In Marathi) खास आहे. यात सफरचंदाची एक बाजू कापलेली दिसते, पण त्याच्यामागची कहाणी काय आहे, हे तुम्हाला माहितीये का?
अॅप्पलच्या लोगोची एक कथा खूप प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की जेव्हा स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोझ्नियाक अॅप्पलचा नवीन लोगो शोधत होते. मग त्यांना महान संगणक शास्त्रज्ञ अॅलन ट्युरिंगची आठवण झाली. अॅलन ट्युरिंग हे शास्त्रज्ञ होते, ज्यांनी महायुद्धाच्या काळात जर्मन कोड तोडण्यासाठी मशीन तयार केली होती. पण नंतर अॅलन यांच्यावर समलैंगिकतेचा आरोप झाला. त्या काळात अमेरिकेत समलैंगिकता हा गुन्हा मानला जात होता. अॅलन यांना सायनाइडने भरलेले सफरचंद खाण्यासाठी देण्यात आले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अर्धे खाल्लेले सफरचंद त्यांच्या अंगाजवळ पडले होता. हे लक्षात घेऊन स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोझ्नियाक यांनी त्यांची आठवण म्हणून हा लोगो ठेवला.
हेही वाचा – Bharat Rice : फक्त 25 रुपये किलोने मिळणार तांदूळ, सरकारची मोठी घोषणा!
सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अॅप्पलच्या लोगोबद्दल अनेक किस्से गाजले होते. ज्यानंतर अॅप्पलचे डिझायनर रॉब झानिफ यांनी स्वतः लोगो अर्धा का कापला हे स्पष्ट केले. ते म्हणाले की हा लोगो तयार करण्यामागील विचार असा होता की लोकांना अॅप्पलचा लोगो सहज ओळखता येईल. अॅप्पलचा लोगो पूर्ण ठेवला असता तर लोकांनी त्याला चेरी किंवा टोमॅटो समजले असते. म्हणूनच त्यांनी कापलेले सफरचंद तयार केले जेणेकरुन ते बाकीच्यांपेक्षा वेगळे असेल. लोक ते खात आहेत असे वाटू शकते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!