अनिल अंबानींचा काळ बदलतोय, आणखी एक कंपनी झाली कर्जमुक्त!

WhatsApp Group

Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स पॉवरसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. त्यांचा व्यवसाय आता हळूहळू रुळावर येत आहे. रिलायन्स पॉवरची उपकंपनी रोजा पॉवर सप्लाय कंपनीने (Rosa Power Supply Company) सिंगापूरस्थित वर्दे पार्टनर्सला 485 कोटी रुपयांच्या थकित कर्जाची परतफेड केली आहे. अशा प्रकारे, कंपनीने एकूण 1,318 कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम प्री-पेड केली आहे. या पेमेंटमुळे रोजा पॉवर सप्लाय कंपनी कर्जमुक्त झाली आहे.

यापूर्वी सप्टेंबरमध्ये रोजा पॉवरने वर्दे पार्टनर्सला 833 कोटी रुपयांचे आगाऊ पेमेंट केले होते. त्यानंतर आता 485 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. रोजा पॉवर उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरजवळील रोजा गावात 1,200 मेगावॅटचा कोळशावर आधारित थर्मल पॉवर प्लांट चालवते. ताळेबंद मजबूत करण्याबरोबरच, रोझा पॉवर, नुकत्याच जारी केलेल्या 1,525 कोटी रुपयांच्या इक्विटी-लिंक्ड वॉरंटसह, रिलायन्स पॉवरला वेगाने वाढणाऱ्या स्वच्छ हरित नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय संधींचा पाठपुरावा करण्यात मदत करेल.

हेही वाचा – DMart Story : एका डी मार्टची रोजची कमाई किती माहितीये?

हा प्रीफरेंश‍ियल शेअर जारी केल्यामुळे, कंपनीची एकूण संपत्ती 11155 कोटी रुपयांवरून 12,680 कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल. याशिवाय, बँकांकडे कर्जाची कोणतीही जबाबदारी नसल्यामुळे, स्वच्छ हरित ऊर्जा क्षेत्रातील वाढीच्या संधींचा पाठपुरावा करण्याचे रिलायन्स पॉवरचे उद्दिष्ट आहे. रिलायन्स पॉवर ही देशातील आघाडीची खासगी क्षेत्रातील वीज निर्मिती आणि कोळसा संसाधन कंपन्यांपैकी एक आहे. खासगी क्षेत्रातील कोळसा, वायू, जलविद्युत आणि नवीकरणीय उर्जेवर आधारित ऊर्जा प्रकल्पांचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे.

रिलायन्स ग्रुपचा भाग असलेल्या रिलायन्स पॉवरकडे 5,300 मेगावॅटचा ऑपरेशनल पोर्टफोलिओ आहे. रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी शेअर 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटसह 43.47 रुपयांवर बंद झाला. यानंतर गुरुवारी सकाळीही स्टॉकमध्ये वाढ होताना दिसत आहे. 44.45 रुपयांवर उघडलेल्या शेअरने 45.63 रुपयांचा उच्चांक गाठला. यासह कंपनीचे मार्केट कॅप 17,915 कोटी रुपये झाले.

वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment