भारताशी नाळ असलेला माणूस ब्रिटनचा पंतप्रधान..! आनंद महिंद्रांची ‘भारी’ प्रतिक्रिया

WhatsApp Group

Anand Mahindra On Rishi Sunak : भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी इतिहास रचला आहे. ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली आहे. सुनक हे पहिले भारतीय आहेत जे ब्रिटीश सरकारच्या सर्वोच्च पदावर असतील. ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यामुळे भारतात जल्लोषाचे वातावरण आहे. ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर भारताचे ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा यांना स्वातंत्र्याचा काळ आठवला. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर याचा उल्लेख केला आहे. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांचे ट्वीट खूप व्हायरल होतात.

काय म्हणाले महिंद्रा?

आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करून म्हटले, ”१९४७ मध्ये, भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी, विन्स्टन चर्चिल यांनी सांगितले होते की, सर्व भारतीय नेते कमी क्षमतेचे असतील. आज, आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात, भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला यूकेचे पंतप्रधान म्हणून शपथ घेताना आपण पाहत आहोत. जीवन जोमात आहे. विन्स्टन चर्चिल हे ब्रिटनचे माजी पंतप्रधान होते.”

हेही वाचा – ‘बापर्डे’करांसाठी अभिमानाचा क्षण..! आसावरी कदम यांना ‘आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा भूषण’ पुरस्कार

२०१५ मध्ये पहिल्यांदा संसदेत पोहोचले सुनक

ऋषी सुनक हे २०१५ मध्ये पहिल्यांदा ब्रिटनच्या संसदेत पोहोचले होते. सुनक यांनी यॉर्कशायरमधील रिचमंडमधून विजय मिळवला. ब्रेक्झिटच्या समर्थनार्थ उभे राहिल्याने सुनक यांची राजकीय उंची वाढू लागली. ऋषी सुनक यांनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत लग्न केले आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment