Amitabh Bachchan : ‘बिग बीं’चा अपघात, रक्त वाहत असल्यामुळं हॉस्पिटलमध्ये नेलं!

WhatsApp Group

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली आहे. कौन बनेगा करोडपतीच्या (KBC) शूटिंगदरम्यान त्यांच्या पायाला दुखापत झाली. अमिताभ यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याच्या पायातून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी टाके घालण्यात आले. सिनेमाचे आयकॉन मानले जाणारे अमिताभ बच्चन रविवारी केबीसीच्या पुढच्या एपिसोडचे शूटिंग करत असताना त्यांचा अपघात झाला.

अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, सेटवरून बाहेर पडताना एका धातूचा तुकडा त्यांच्या पायाच्या मागच्या बाजूला घासला गेला आणि त्यामुळे त्यांच्या पायाची नस कापली गेली. छोट्या ऑपरेशननंतर टाके घालण्यात आले, त्यानंतर रक्तस्त्राव थांबला. डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. अमिताभ यांना सध्या चालण्यासही मनाई आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2022 IND Vs PAK : अर्शदीप-पंड्याचा तिखट वार..! भारतापुढं १६० धावांचं लक्ष्य

खुद्द अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर ही माहिती दिली आहे. नुकताच अमिताभ यांनी त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा केला. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये असेही सांगितले आहे की, ते केबीसीच्या सेटवर जेवढा वेळ घालवतात, त्यादरम्यान त्यांची विशेष काळजी घेतली जाते. त्यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त केबीसीच्या टीमने एका खास एपिसोडचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि जया बच्चन यांचाही सहभाग होता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment