Collision Between Two Planes : अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एअर शो सुरू असताना एक भीषण अपघात झाला. इथे डॅलसमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील २ युद्ध विमाने हवेत आदळली. हा अपघात इतका भीषण होता की टक्कर होताच एका विमानाचे मधूनच दोन तुकडे झाले, तर दुसरे विमान पूर्णपणे चक्काचूर झाले. या अपघातात पायलट आणि क्रू मेंबर्ससह ६ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार, शनिवारी अमेरिकेतील डॅलस येथे वर्ल्ड वॉर-२ स्मरणार्थी एअरशो आयोजित करण्यात आला होता. ते पाहण्यासाठी लांबून लोक येत होते. एअर शो सुरू असताना अचानक बोईंग बी-१७ फ्लाइंग फोर्ट्रेस बॉम्बरची दुसऱ्या बेल पी-६३ किंगकोब्रा फायटरशी टक्कर झाली.
हेही वाचा – Video : “मी राजीनामा देतो आहे…”, विनयभंगाचा आरोप झाल्यावर जितेंद्र आव्हाडांची घोषणा!
डॅलस एक्झिक्युटिव्ह विमानतळाजवळ हा अपघात झाला. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरवर सांगितले की, आपत्कालीन कर्मचारी अपघाताच्या ठिकाणी पोहोचले आहेत. अपघातानंतर विमानातील क्रू मेंबर्सची चौकशी करण्यात येत आहे. दोन्ही विमानांमध्ये किती लोक होते हे लगेच स्पष्ट झालेले नाही.
OMG – two planes collided at ‘Wings Over Dallas’ air show today
This is crazy
— James T. Yoder (@JamesYoder) November 12, 2022
दुसऱ्या महायुद्धातील लढाऊ विमानांच्या जतनासाठी समर्पित गट, Commissariat Air Force (CAF) चे अध्यक्ष आणि CEO हँक कोट्स म्हणाले की, B-१७ मध्ये साधारणपणे चार ते पाच लोकांचा क्रू असतो. कोट्स म्हणाले की P-६३ मध्ये फक्त एक पायलट आहे, परंतु अपघाताच्या वेळी विमानात इतर किती लोक होते हे त्यांनी सांगितले नाही.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये ही घटना दर्शविली गेली आहे, जी अनेक लोकांनी कॅमेऱ्यात कैद केली आहे, दोन विमाने जमिनीवर आदळताना आणि आगीच्या ज्वाळांमध्ये गुरफटलेली दिसत आहेत. लाइव्ह एरियल व्हिडिओमध्ये, अपघाताच्या ठिकाणी विमानाचा अवशेष दिसत आहे. FAA आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) या दोघांनी तपास सुरू केला आहे, NTSB ने सुरुवात केली आहे आणि अधिकार्यांना अद्यतने प्रदान केली आहेत.