VIDEO : फक्त १००० रुपयांसाठी अ‍ॅम्ब्युलन्स कर्मचाऱ्यांचं ‘गर्भवती’ महिलेसोबत संतापजनक कृत्य!

WhatsApp Group

Ambulance Driver Leaves Pregnant Women On Road : हमीरपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका गर्भवती महिलेला रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी एक हजार रुपये न दिल्यानं अर्ध्या रस्त्यावरच सोडलं असल्याचं वृत्त आहे. रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांच्या या कृत्यामुळं संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी रस्त्यावरच एकच गोंधळ घातला. रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात ही महिला बराच वेळ वेदनेनं रडत राहिली, पण रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी काहीही केलं नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली आणि दुसरी रुग्णवाहिका पाठवून त्या महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल केलं.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपूर भागातील भौंरा गावातील रहिवासी उत्तम कुमार निषाद यांनी पत्नी रेखा निषादच्या प्रसूतीसाठी रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांना फोन केला. माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक अभिषेक कुमार आणि ईएमटी अजित कुमार रुग्णवाहिका घेऊन गावात पोहोचले. रुग्णवाहिकेचे कर्मचारी वेदनेनं ओरडत कुटुंबीयांसह रुग्णवाहिकेत बसून शासकीय रुग्णालयाकडं निघाले. रुग्णवाहिका पारा गावाजवळ येताच कर्मचाऱ्यांनी एक हजार रुपयांची मागणी केली, पैसे न दिल्यानं रुग्णवाहिकेनं गरोदर महिलेला जंगलात सोडून दिल्याचं नातेवाईकांनी सांगितलं.

हेही वाचा की –पाळीव कुत्र्यानं लिफ्टमध्ये घेतला चावा..! वेदनेनं रडू लागलं पोरगं; पाहा VIDEO

रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांच्या या कारवाईमुळं संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी रस्त्याच्या कडेला एकच गोंधळ घातला. पैसे न दिल्याने त्या महिलेला रस्त्याच्या कडेला टाकून दिल्याचे सासू रामस्वरूप निषाद यांनी सांगितलं. रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी महिलेला मौहर गावातील शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितलं, असा आरोप नातेवाईकांनी केला. मात्र पैसे न दिल्यानं या महिलेला जंगलात बळजबरीनं सोडून दिलं. एसीएमओ डॉ. महेश चंद्र यांनी सांगितलं, की गर्भवती महिलेला मौहर गावातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथं तिनं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया

या प्रकरणाबाबत रुग्णवाहिका कर्मचारी आणि चालक अभिषेक कुमारनं सांगितलं, की प्रसूतीसाठी फारच कमी वेळ शिल्लक होता. त्यामुळं पंढरीला काही किमी अंतरावर असलेल्या एएनएम सेंटरमध्ये नेत असताना पारा गावाजवळ रुग्णवाहिकेचा दरवाजा जबरदस्तीनं उघडून कुटुंबीयांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला. गाडी थांबल्यावर प्रसूतीसह कुटुंबीय खाली उतरले. बराच वेळ समजावून सांगितल्यानंतर महिलेला मौहर गावातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment