Amazon Great Republic Day Sale : अर्ध्या किंमतीत घरी आणा AC, फ्रिज..! अॅमेझॉनवर बंपर सेल सुरू

WhatsApp Group

Amazon Great Republic Day Sale : अॅमेझॉनवर मोठा सेल सुरु झाली आहे. या सेलमध्ये अनेक उत्पादने बंपर डिस्काउंटसह विकली जात आहेत. सेल दरम्यान, तुम्ही स्मार्टफोन्सपासून ते एसीपर्यंतच्या सर्व गोष्टींवर प्रचंड सवलतींचा लाभ घेऊ शकता. या सेलमध्ये तुम्ही एसी आणि फ्रीज स्वस्तात खरेदी करू शकता. अनेक उत्पादने अर्ध्या किमतीत विकली जात आहेत. या सेलमध्ये तुम्ही १ टन ते २ टन पर्यंतचे एसी ५० टक्क्यांपर्यंत सवलतीत खरेदी करू शकता. याशिवाय, तुम्ही रेफ्रिजरेटरवर ५० % पर्यंत सूट देखील घेऊ शकता. येथे तुम्हाला एसी आणि रेफ्रिजरेटरवर उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम डील्सबद्दल सांगितले जात आहे.

AC वर बंपर डिस्काउंट

कंपनीचा दावा आहे की सेल दरम्यान तुम्ही एलजी, व्होल्टास, गोदरेज, ब्लू स्टार आणि इतर ब्रँडच्या एसींवर सूट मिळवू शकता. सेल दरम्यान, तुम्ही कॅरियर १.५ टन ३ स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी ३६,४५० रुपयांना खरेदी करू शकता तर १.५ टन व्होल्टास इन्व्हर्टर स्प्लिट एसीची किंमत ३७,४९९ रुपये असेल.

हेही वाचा – बँकेचा हप्ता वाढणार…! SBI च्या ग्राहकांना धक्का; EMI सुद्धा महागणार!

कंपनीच्या म्हणण्यानुसार, कॅरियर १.५ टन ५ स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसीची मूळ किंमत ७६०९० रुपये आहे तर ती ३७९९९ रुपयांना विक्री केली जात आहे. AmazonBasics १.५ टन ३ स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी ५२,९९९ रुपयांऐवजी २८,९९० रुपयांना विकला जात आहे.

फ्रीजवर सूट

विक्रीदरम्यान तुम्ही डबल डोअर, सिंगल डोअर किंवा साइड बाय साइड रेफ्रिजरेटर्सवर बंपर सूट मिळवू शकता. विक्रीदरम्यान, LG २६० L ३ स्टार डबल डोअर रेफ्रिजरेटर ३९% पर्यंत सूट देऊन खरेदी करता येईल. गोदरेज १८५ एल २ स्टार डायरेक्ट कूल सिंगल डोअर रेफ्रिजरेटर ३० टक्के सूट आणि कूपन डिस्काउंटसह खरेदी केले जाऊ शकते.

या सेलमध्ये, तुम्ही गोदरेज ५६४ L फ्रॉस्ट फ्री साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर ३९ % सूटसह खरेदी करू शकता. व्हर्लपूल ५७० L इन्व्हर्टर फ्रॉस्ट-फ्री मल्टी-डोअर रेफ्रिजरेटर ३८ टक्के सूट देऊन खरेदी करता येईल. Haier ६३० L डबल डोअर साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटरवर ५० % सूटसह खरेदी करता येईल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment