अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका आला. अक्षय कुमारच्या ‘वेलकम 3’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो अचानक बेशुद्ध पडला. त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अँजिओप्लास्टीनंतर त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. 47 वर्षीय श्रेयसने आपल्या मेहनतीने चित्रपटसृष्टीत आपले विशेष स्थान निर्माण केले.
एक वेळ अशी होती की श्रेयस तळपदेकडे बसचे तिकीट काढण्यासाठी किंवा सँडविच खाण्यासाठीही पैसे नव्हते. आज त्याची कमाई करोडोंमध्ये आहे. हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटात त्याने आपले स्थान निर्माण केले आहे. त्याचे स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म देखील आहे. श्रेयसची एकूण संपत्ती 37 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी तो 2 ते 3 कोटी रुपये घेतो. जाहिरातींमधूनही त्याला चांगले उत्पन्न मिळते.
मुंबईतील ओशिवरा येथे श्रेयसचे आलिशान घर आहे. हे 4000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. एवढेच नाही तर वॉल्डॉर्फ बिल्डिंगमध्ये त्याचे दोन फ्लॅट्स आहेत. श्रेयस हा मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये गणला जातो.
हेही वाचा – स्टेट बँकेकडून कर्ज घेणे महागले! ग्राहकांना धक्का, आजपासूनच…
श्रेयसकडे आलिशान गाड्यांचे सुंदर कलेक्शन आहे. मर्सिडीज-बेंझ, होंडा एकॉर्ड, ऑडी क्यू7 आणि ऑडी ए8एल अशा आलिशान गाड्यांचा मालक श्रेयस तळपदे याच्याकडे एकेकाळी बसचे भाडे भरायला पैसे नव्हते. कित्येक वेळा पैसे नसल्यामुळे स्टुडिओमध्ये जाता येत नव्हते. पण त्याने हिम्मत न हारता कठोर परिश्रमाने आपले भाग्य बदलले.
श्रेयस तळपदेने आपल्या अभिनय कारकिर्दीला मराठी टीव्हीवरून सुरुवात केली. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘इकबाल’ चित्रपटातून त्याला ओळख मिळाली. श्रेयसने ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या व्यक्तिरेखेसाठी हिंदी डबिंग केले. यानंतर जग त्याच्या आवाजाचे चाहते झाले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!