भविष्य पाहण्याचा दावा करणाऱ्या एका प्रसिद्ध माणासाने लोकांना नवीन वर्षापूर्वी लोकांना सावध केले आहे. 2024 मध्ये लोकांना धोका होईल, असे काय होणार आहे, याचे उत्तर त्याने दिले आहे (Athos Salome Prediction For 2024). एथोस सालोमे असे या व्यक्तीचे नाव असून तो ब्राझीलमध्ये राहतो. त्याच्या भविष्यवाणीमुळे, त्याला जिवंत नॉस्ट्राडेमस देखील म्हटले जाते. या व्यक्तीचे यापूर्वीचे अनेक दावे खरे ठरले आहे. यात गेल्या वर्षी राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूपासून ते इलॉन मस्क यांच्या ट्विटर ताब्यात घेण्यापर्यंतच्या सर्व गोष्टींचा समावेश आहे.
ब्राझीलचा भविष्यवक्ता एथोस सालोमे याला आधुनिक युगातील नॉस्ट्राडेमस म्हटले जाते. कोविड 19 साथीचा रोग, राणी एलिझाबेथ II चा मृत्यू आणि इलॉन मस्क यांची ट्विटर डील या सर्वांचा अंदाज वर्तवल्याचा दावा एथोसने केला होता. यासोबत एथोसने 2023 मध्ये तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला होता.
एथोसने लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. तो म्हणाला, ”आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सीसीटीव्हीची ताकद आणखी वाढते. चीन आणि अमेरिकेत विकसित होत असलेले फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान असे युग घेऊन येणार आहे, ज्यामध्ये कोणतीही प्रायव्हसी राहणार नाही. आधुनिक पाळत ठेवण्याची स्थिती ही आपल्या जगात मोठ्या प्रमाणावर पाळत ठेवण्याच्या आणि नियंत्रणाच्या विशाल जाळ्याचे प्रतीक आहे. आपण झपाट्याने अशा वास्तवाकडे वाटचाल करत आहोत, जिथे प्रायव्हसी सरकार आणि कॉर्पोरेशनला लोकांच्या वैयक्तिक माहितीमध्ये प्रवेश देणारी एक गोष्ट बनेल.
हेही वाचा – रस्ते अपघातातील जखमींना सरकारकडून मोफत उपचार, संपूर्ण भारतात लागू होणार व्यवस्था!
एथोसच्या या भविष्यवाणीपूर्वी रशिया देशभरात 50 लाख कॅमेरे बसवणार असल्याची बातमी आली होती. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन त्यांच्या नागरिकांवर पाळत ठेवतील. रशियाचे डिजिटल विकास मंत्रालय संपूर्ण प्रणालीचे केंद्रीकरण करू इच्छित आहे, जेणेकरून क्रेमलिन (रशियन राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय) मध्ये बसलेल्या लोकांना फुटेज मिळू शकेल. एथोसने लोकांना त्यांची वैयक्तिक माहिती कशी गोळा केली जाते, आणि वापरली जाते याबद्दल सतर्क राहण्यास सांगितले.
”मला माहितीये की माझे अंदाज कधी कधी माझ्या मनात कल्पिल्यासारखे वाटू शकतात. ते शून्यता आणि पूर्णतेतून जातात. हा अंदाज नाही. उलट, काही घटना पुन्हा घडण्याच्या संभाव्यतेवर आधारित हे अंदाज आहेत. सध्या हे अंदाज 2024 साठी आहेत. येत्या काही वर्षांत हे खरेही होऊ शकते”, असे एथोसने सांगितले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!