Akshay Kumar On Richa Chadha’s Statement : अभिनेत्री रिचा चढ्ढा यांनी नुकतेच नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या ‘गलवान हाय बोल रहा है’ या वक्तव्यावर ट्वीट केले होते. तिच्या या ट्वीटनंतर ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रिचाला सर्व बाजूंनी लक्ष्य केले जात आहे. या प्रकरणावर आता अक्षय कुमारही बोलला आहे. रिचाच्या या वक्तव्यावर अक्षय कुमारला खूप वाईट वाटले आहे.
रिचा चढ्ढाने नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या वक्तव्यावर आपले मत व्यक्त केले होते. आपल्या ट्वीटमध्ये तिने म्हटले होते की, भारतीय लष्कर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत घेण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास तयार आहे. आम्ही शासनाच्या आदेशाची वाट पाहत आहोत. आम्ही लवकरच ऑपरेशन पूर्ण करू. रिचाने सांगितलेली ही गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी खूप आश्चर्यचकित करणारी होती.
हेही वाचा – SBI Recruitment 2022 : स्टेट बँकेत नोकरीची संधी..! ना लेखी परीक्षा ना अर्जाची फी; ‘असं’ करा Apply
अक्षयची प्रतिक्रिया
रिचाच्या या बोलण्यामुळे बॉलिवूड स्टार अक्षय कुमारलाही खूप वाईट वाटले आहे. रिचाच्या व्हायरल ट्वीटचा स्क्रीनशॉट ट्वीट करताना त्याने लिहिले, ”हे पाहून वाईट वाटत आहे. आपल्या सैन्यदलाबद्दलचे उपकार कधीही विसरता कामा नये. आज आपण फक्त त्यांच्यामुळेच आहोत.” त्याच्या पोस्टसोबत अक्षयने हाताची घडी घातलेला इमोजीही शेअर केला आहे.
Hurts to see this. Nothing ever should make us ungrateful towards our armed forces. Woh hain toh aaj hum hain. 🙏 pic.twitter.com/inCm392hIH
— Akshay Kumar (@akshaykumar) November 24, 2022
रिचाने कधीच विचार केला नसेल की तिची एक टिप्पणी तिच्यासाठी इतकी मोठी समस्या बनू शकते. या गदारोळानंतर तिने माफीही मागितली होती. ”माझा उद्देश लष्कराचा अपमान करण्याचा नव्हता. माझ्या तीन शब्दांवरून वाद वाढत आहे. माझ्या बोलण्यामुळे कोणाला वाईट वाटले असेल तर त्याबद्दल मी माफी मागते”, असे रिचाने म्हटले आहे.