Airtel ने लाँच केले पाच नवे 5G रिचार्ज प्लॅन..! मिळणार OTT बेनिफिट्स

WhatsApp Group

Airtel 5G Recharge Plans : एअरटेलने प्रीपेड यूजर्ससाठी एक किंवा दोन नव्हे तर 5 नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. या प्लॅनची ​​किंमत 499 रुपयांपासून सुरू होते जी 3359 रुपयांपर्यंत जाते. या प्लॅनचे तुम्हाला कोणते फायदे मिळतील? जाणून घ्या..

499 प्लॅन

499 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता, दररोज 100 एसएमएस, अमर्यादित 5G डेटा आणि कॉलिंग सुविधा देण्यात आली आहे. तसेच, तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल, विंक सबस्क्रिप्शन आणि एक्सट्रीम अॅप बेनिफिट 3 महिन्यांसाठी दिले जातात. या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा दिला जात आहे.

699 प्लॅन

699 रुपयांच्या या एअरटेल प्लॅनमध्ये 56 दिवसांची वैधता, अमर्यादित व्हॉइस आणि 5G डेटा, तसेच दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळणार आहे. याशिवाय अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप, विंक म्युझिक आणि एक्स्ट्रीम अॅपचा अ‍ॅक्सेसही 56 दिवसांसाठी उपलब्ध असेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3 जीबी डेटाही मिळेल.

हेही वाचा – IPL 2023 : ‘धोनी रिव्यू सिस्टम’ फेल होताच ‘थाला’चा चेहरा उतरला..! पाहा Video

839 प्लॅन

या एअरटेलच्या नवीन प्लॅनमध्ये, ज्याची वैधता 84 दिवस आहे, तुम्हाला दररोज 100 एसएमएस दिले जातील आणि अमर्यादित 5G डेटा आणि विनामूल्य कॉलिंगचा लाभ देखील मिळेल. यासोबतच तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टार, रिवॉर्ड्स मिनी सबस्क्रिप्शन, एअरटेल एक्स्ट्रीम अॅप आणि विंक सबस्क्रिप्शनचा लाभ 3 महिन्यांसाठी मिळेल. डेटाबद्दल बोलायचे झाले तर, हा प्लान तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा देईल.

999 प्लॅन

या प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB हाय स्पीड डेटा, मोफत कॉलिंग आणि अमर्यादित 5G डेटा मिळतो, कंपनी 84 दिवसांची वैधता ऑफर करत आहे. तुम्हाला 84 दिवसांसाठी Amazon प्राइम मेंबरशिप, Wynk Music, Rewards Mini Subscription आणि Extreme App फायदे मिळतील.

3359 प्लॅन

दररोज 100 एसएमएस, अमर्यादित 5G डेटा आणि कॉलिंगसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाइल, Wynk सबस्क्रिप्शन, अपोलो 24/7 लाभांसह 1 वर्षासाठी दररोज 2.5 जीबी डेटा मिळेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment