7 ते 11 सप्टेंबर 2023 दरम्यान प्रवाशांसाठी विशेष सुविधा, Air India ची घोषणा!

WhatsApp Group

Air India : एअर इंडियाने आपल्या प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे. एअर इंडियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सांगितले की, 7 ते 11 सप्टेंबर 2023 दरम्यान दिल्लीमध्ये प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या काळात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन विमान कंपनीने प्रवाशांना विशेष सवलतही दिली आहे.

G20 संदर्भात दिल्लीत तयारी सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यापासून ते जगातील अनेक मोठे नेते या समिटमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे 7 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान दिल्लीहून विमान प्रवासावर काही निर्बंध असतील. दिल्ली विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीसाठी एअरलाइन्सने दिल्लीला जाणारी आणि तेथून जवळपास 160 उड्डाणे रद्द केली आहेत.

हेही वाचा – RBI ची UPI संदर्भात मोठी घोषणा! आता क्षणार्धात मिळणार लाखोंचे कर्ज

ऑफर

एअर इंडियाने सांगितले, की दिल्लीहून 7 ते 11 सप्टेंबर 2023 पर्यंतच्या फ्लाइटचे कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना लागू शुल्कात सवलत दिली जात आहे. ही सवलत फक्त अशाच प्रवाशांना मिळेल ज्यांना त्यांच्या प्रवासाची तारीख किंवा त्यांची फ्लाइट बदलायची आहे. जर प्रवाशाला त्याच्या फ्लाइटची किंवा फ्लाइटची तारीख बदलायची असेल, तर त्याला रिशेड्युल केलेल्या फ्लाइटच्या भाड्यातील फरकच भरावा लागेल. भाड्यात काही फरक असल्यास हे देखील होईल. भाड्यात फरक नसल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

प्रवाशांच्या सोयीसाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. एअर इंडियाची ही ऑफर दिल्लीहून प्रवास करणाऱ्या आणि दिल्लीला येणाऱ्या दोन्ही प्रवाशांसाठी निश्चित करण्यात आली आहे. एअर इंडियाने प्रवाशांना अधिक माहिती मिळावी यासाठी दोन क्रमांकही जारी केले आहेत. प्रवाशांना जे काही प्रश्न असतील ते या क्रमांकांवर संपर्क करून जाणून घेऊ शकतात, असे कंपनीने म्हटले आहे. हे क्रमांक 0091242641407/00912026231407 एअर इंडियाने जारी केले आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment