56 वर्षांनंतर सापडला भारतीय जवानाचा मृतदेह, वाट पाहणाऱ्या पत्नी, मुलाचे झालंय निधन

WhatsApp Group

Soldier’s Body Found 56 Years : 7 फेब्रुवारी 1968 चा तो दिवस मला अजूनही आठवतो, जेव्हा मोठा भाऊ मलखान सिंग (23) यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. त्यावेळी माझे वय 12 वर्षांच्या आसपास असेल, पण मला घरच्या परिस्थितीची जाणीव होती. आई-वडील आणि वहिनींसह घरातील इतर सदस्य कसे कोपऱ्यात जाऊन रडायचे ते ते पाहायचे. कारण शेवटच्या क्षणी कुटुंबातील एकाही सदस्याला त्यांचा चेहराही दिसू शकला नाही किंवा त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करता आले नाहीत. तब्बल 56 वर्षांनंतर जेव्हा लष्कराच्या जवानांनी येऊन मृतदेह बाहेर काढल्याची माहिती दिली तेव्हा वेदना ताज्या झाल्या, हे सांगताना मलखान सिंगचा धाकटा भाऊ इसमपाल सिंगच्या डोळ्यात अश्रू तरळले.

1968 मध्ये शहीद झालेले जवान मलखान सिंग यांचे पार्थिव 56 वर्षांनंतर सापडले आहे. मलखान सिंग हे विमान अपघातात शहीद झाले. त्यावेळी त्यांच्या मृतदेहाचा पत्ता लागला नव्हता. 56 वर्षांनंतर मलखान सिंग यांचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला आहे. इतक्या वर्षांनंतर मृतदेह कसा सापडला यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता, मात्र हवाई दलानेच मृतदेह सापडल्याची अधिकृत पुष्टी केली आहे.

हेही वाचा – RD vs SIP : आरडी की एसआयपी? कशात पैसे गुंतवणं फायदेशीर? जाणून घ्या

मंगळवारी मलखान सिंग यांचा लहान भाऊ इसमपाल सिंग यांना मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. मलखान यांची पत्नी आणि एकुलता एक मुलगा मरण पावला आहे. एक सून, नातू गौतम आणि मनीष आणि एक नात आहे.

मलखान सिंग यांचे पार्थिव गावात आणल्यानंतर लोकांच्या मनात देशप्रेमाची भावना निर्माण झाली आहे. शहीद मलखान सिंग यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीही चांगली नाही. कदाचित सरकारकडून काही तरी मदत मिळेल किंवा नोकरी मिळेल, अशी या कुटुंबाला पूर्ण आशा आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment