Shraddha Murder Case : आफताबची कोर्टात कबुली; म्हणाला, “जे काही केलं ते..”

WhatsApp Group

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबच्या पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्याला मंगळवारी सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साकेत न्यायालयात हजर करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आफताबने कोर्टात पहिल्यांदा न्यायाधीशांसमोर आपला गुन्हा कबूल केला. तो म्हणाला, ”जे काही केले ते रागात केले. मी सर्व काही पोलिसांना सांगितले आहे. आता ती घटना आठवणे कठीण होत आहे.” आफताबची आज पॉलीग्राफ चाचणी होऊ शकते.

आफताबचे वकील अविनाश यांनी आफताबला भेटण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. अविनाशच्या म्हणण्यानुसार कोर्टाने आफताबला भेटण्याची परवानगी दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आफताबने पोलिसांना ज्या तलावात श्रद्धाचे तुकडे फेकले होते त्याचे रेखाचित्र दिले आहे. आफताबला अटक झाल्यापासून कोणीही त्याला भेटलेले नाही.

हेही वाचा – “PM मोदींच्या हत्येचा कट…”, मुंबई वाहतूक पोलिसांच्या WhatsApp नंबरवर मेसेज; सर्वत्र खळबळ!

आफताबचा खुलासा!

आफताबने चौकशीदरम्यान खुलासा केला आहे की, श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहाचे छिन्नविछिन्न करण्यासाठी वापरलेले करवत आणि ब्लेड गुरुग्राममध्ये फेकले होते. हत्येचे हत्यार शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी गुरुग्रामच्या जंगली भागात आतापर्यंत दोनदा शोध घेतला आहे. आता पोलीस पुन्हा जंगलात शोधमोहीम राबवणार आहेत.

आरोपी आफताबच्या पॉलीग्राफ किंवा लाय डिटेक्टर चाचणीसाठी पोलिसांना परवानगी मिळाली आहे. आफताब खोटी माहिती देत ​​असून तपासाची दिशाभूल करत असल्याचे दिल्ली पोलिसांनी यापूर्वी न्यायालयाला सांगितले होते. या चाचणीमध्ये व्यक्तीच्या हृदयाचे ठोके, नाडी, श्वास घेण्याची प्रक्रिया लक्षात घेऊन प्रश्न विचारले जातात. खोटे उत्तर दिल्यास त्या व्यक्तीचे हृदयाचे ठोके, नाडी आणि श्वासोच्छवास अनियमित होतो, त्यामुळे त्याचे उत्तर योग्य आणि चुकीचे मानले जाते.

Leave a comment