कोर्टात सुनावणीदरम्यान अचानक सुरू झाला ‘अश्लील’ Video; जजसाहेबांनी बंद केली केस!

WhatsApp Group

Adult Video In Court Hearing : ब्रिटनमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. खरं तर, सुनावणी दरम्यान अचानक, मोठ्या आवाजासह अश्लील क्लिप स्क्रीनवर दिसू लागली. मग काय, संतापलेल्या न्यायमूर्तींनी तत्काळ प्रकरण रद्द करून चौकशीचे आदेश दिले. सुनावणीदरम्यान हा प्रकार घडला तेव्हा कोर्टरूममध्ये अनेक लोक उपस्थित होते.

ब्रिटीश वृत्तपत्र डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार, यॉर्कशायरचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश जेरेमी रिचर्डसन क्यूसी प्रकरणाची सुनावणी करत असताना ही घटना घडली. वृत्तानुसार, ड्रग्ज आणि मोबाइल फोनच्या तस्करीबाबत सुनावणी सुरू होती. एका बॅरिस्टरने नाव जाहीर न करण्याच्या इच्छेने द टाइम्सला सांगितले की सुनावणीदरम्यान अश्लील आवाज “निश्चितपणे” ऐकू आले. या घटनेने सर्वांनाच लाजवले.

हेही वाचा – Video : पुन्हा तेच..! श्रद्धानंतर आणखी एका मुलीची हत्या; शरीराचे केले ६ तुकडे!

संतप्त न्यायाधीश

न्यायाधीशांनी मायक्रोफोन बंद करण्यास सांगितले. मात्र तसे झाले नाही. यानंतर न्यायाधीशांनी अचानकपणे कामकाज संपवले. आता व्हिडिओ लिंकद्वारे सुनावणी होणार नाही, असे न्यायाधीशांनी सांगितले. न्यायमूर्तींनी तुरुंगातून CVP लिंकद्वारे सुनावणीला उपस्थित असलेल्यांना निःशब्द केल्यानंतर आवाज थोडा कमी झाला असे बॅरिस्टर म्हणतात. काही रिपोर्ट्सनुसार, काही खोडकर लोकांनी हे काम केल्याचा दावा केला जात आहे. सुनावणीदरम्यान व्हिडिओ लिंक हॅक झाल्याचा दावा केला जात आहे. गेल्या काही दिवसांत न्यायाधीशांनी व्हिडिओ लिंकबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत.

 

Leave a comment