Aditya L1 Launching Live Streaming : इस्रोच्या आदित्य एल-1 या सोलार मिशनचे काऊंट़डाऊन सुरू झाले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ही माहिती दिली आहे. भारताचे पहिले सोलार मिशन आदित्य एल-1 हे शनिवारी, 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केले जाईल. यासोबतच ISRO ने त्या प्लॅटफॉर्मची माहिती देखील शेअर केली आहे जिथे शनिवारी सकाळी 11.20 वाजल्यापासून आदित्य एल-1 चे प्रक्षेपण लाईव्ह पाहता येईल.
तुम्ही इथे लाइव्ह पाहू शकता
- इस्रो वेबसाइट- https://isro.gov.in
- फेसबुक- https://facebook.com/ISRO
- युट्यूब- https://youtube.com/watch?v=_IcgGYZTXQw
- याशिवाय डीडी नॅशनल टीव्ही चॅनलवर
श्रीहरिकोटा येथील केंद्रातून आदित्य एल-1 चे प्रक्षेपण लाइव्ह पाहण्यासाठी इस्रोने व्ह्यू गॅलरी सीट्स बुक करण्याचा पर्यायही दिला होता. मात्र, या जागा मर्यादित होत्या, त्यामुळे नोंदणी सुरू झाल्यानंतर काही वेळातच त्या भरण्यात आल्या. आता इस्रोने माहिती दिली आहे की तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्मवर हे प्रक्षेपण लाइव्ह पाहू शकता.
हेही वाचा – World Cup 2023 : ‘या’ तारखेला होणार भारतीय संघाची घोषणा! पाहा संभाव्य 15 खेळाडू
प्रक्षेपण करण्यापूर्वी, आदित्य-एल-1 मिशनच्या मिनी मॉडेलसह ISRO शास्त्रज्ञांची एक टीम तिरुमला श्री वेंकटेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यासाठी पोहोचली. आदित्य यान PSLV-C57 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले जाईल. दोन दिवसांपूर्वी इस्रोकडून ‘रॉकेट आणि सॅटेलाइट तयार आहेत’ असे सांगण्यात आले होते. वाहनाची अंतर्गत तपासणी करण्यात आली असून, तालीमही पूर्ण झाली आहे. 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित केल्यानंतर, इस्रोचे अंतराळ यान एल-1 पॉईंटवर प्रयाण करेल. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 4 महिने लागतील.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!