Adipurush Leaked : ‘या’ बेवसाईटवर HD क्वालिटीत ‘आदिपुरुष’ लीक!

WhatsApp Group

Adipurush Leaked : प्रभास आणि क्रिती सेनॉनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘आदिपुरुष’ आज म्हणजेच 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाबाबत अशी बातमी आली आहे, ज्यानंतर दिग्दर्शक ओम राऊत यांना धक्का बसू शकतो. या चित्रपटाबाबत बरीच चर्चा रंगली होती. रामायणाच्या पौराणिक कथेवर आधारित हा चित्रपट पायरेटेड वेबसाईटवर ऑनलाईन लीक झाला आहे.

रामायणातील पौराणिक कथेवर आधारित प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रचंड वादानंतर अखेर आज प्रदर्शित झाला आहे. प्रभास आणि क्रितीच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आगाऊ बुकिंगच्या बाबतीत या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच भरपूर कलेक्शन केले आहे. मात्र आता निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला दिग्दर्शक ओम राऊत यांचा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. निर्मात्यांसाठी हा मोठा धक्का असला तरी त्याचा चित्रपटाच्या कलेक्शनवर किती परिणाम होतो हे येणारा काळच सांगेल.

हेही वाचा – लसूण खाताय? असतात खास गुणधर्म, ह्रदयाच्या समस्येवर रामबाण उपाय!

चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून ओम राऊतचा चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होताच निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रभास-क्रिती सेनॉनचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच पायरेटेड वेबसाइटवर ऑनलाइन लीक झाला आहे. या बातमीमुळे निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. हिंदू महाकाव्य रामायणावर आधारित ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट पायरसीचा बळी ठरलेला पहिला चित्रपट नाही, याआधीही अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ऑनलाईन लीक झाले आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांनी Tamilrockers, Filmyzilla, Movierulz आणि अनेक ऑनलाइन पायरसी वेबसाइटवर ऑनलाइन देखील उपलब्ध आहे.

‘आदिपुरुष’ची धमाल पाहता हा चित्रपट पहिल्याच दिवशी अनेक विक्रम मोडू शकेल असे वाटते. ओम राऊतचा हा चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी 40 ते 50 कोटींचा गल्ला जमवू शकतो, असे बोलले जात आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment