Vikram Gokhale Death : विक्रम गोखले यांचे हे गाजलेले ५ चित्रपट नक्की पाहाच!

WhatsApp Group

Actor Vikram Gokhale Death : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या १८ दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. बुधवारपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. यादरम्यान त्यांच्या मृत्यूची अफवाही उठली होती, ज्याचे कुटुंबीयांनी खंडन केले होते.

शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती, मात्र अनेक अवयव निकामी झाल्याने शनिवारी दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव पुण्यातील बाल गंधर्व रंगमंदिरात ठेवण्यात आले, त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबाव्यतिरिक्त काही जवळचे लोकही उपस्थित होते.

चित्रपट पार्श्वभूमीशी संबंधित

विक्रम गोखले हे मराठी रंगभूमी, हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये सक्रिय होते. ते चित्रपट अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र होते. विक्रम गोखले यांची आजी कमलाबाई गोखले या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला बालकलाकार होत्या.

हेही वाचा – Horoscope Today : ‘या’ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास; काहींचा उदास; वाचा राशीभविष्य

हे चित्रपट पाहाच..

सलीम लंगडे पे मत रो (१९८९) : सईद अख्तर मिर्झाचा चित्रपट विक्रम गोखले यांनी संस्मरणीय बनवला होता. या चित्रपटात विक्रम यांनी मुख्य अभिनेता सलीमच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट छायांकनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

हम दिल दे चुके सनम (१९९९) : तुम्ही सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा हम दिल दे चुके सनम हा चित्रपट पाहिला असेलच. या चित्रपटात विक्रम यांनी पंडित दरबार आणि ऐश्वर्या रायच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांच्या कडक शिस्तीने सलमान आणि ऐश्वर्याला वेगळे केले. हा चित्रपट प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील.

आघात (२०१०) : या चित्रपटात विक्रम गोखले यांनी डॉ. खुराना यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. दिग्दर्शित केलेला हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात मोठमोठ्या खासगी रुग्णालयातील खराब व्यवस्था, मजीर आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत प्रशासनाचा दृष्टिकोन दाखवण्यात आला आहे.

अनुमती (२०१३) : या चित्रपटातील विक्रम गोखले यांचा सुरेख अभिनय कायम स्मरणात राहील. रीमा लागू, नीना कुलकर्णी, सुबोध भावे या कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे. या चित्रपटाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. तर विक्रम गोखले यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भूल भुलैया २००७ : तुम्हाला अक्षय कुमारचा ‘भूल भुलैया’ हा चित्रपट आठवत असेलच. या चित्रपटात विक्रम गोखले यांनी श्री यज्ञप्रकाशजी भारती नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Leave a comment