Vijay Deverakonda To Donate Organs : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने मोठा निर्णय घेतला आहे, जो ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे, सोबतच लोक त्याच्याविषयी अभिमानाची भावनाही व्यक्त करत आहेत. विजय देवरकोंडाने आपल्या शरीराचे सर्व अवयव दान करणार असल्याची घोषणा केली आहे. एका वैद्यकीय कार्यक्रमात याबद्दल बोलून लोकांना तसे करण्यास देवरकोंडाने प्रवृत्त केले.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विजय देवरकोंडाच्या आईनेही हे उदात्त काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ”मला वाटते की मी माझे सर्व अवयव दान करेन. मी गेल्यानंतर कोणाचा तरी एक भाग व्हायला आणि त्यांना मदत करायला मला आवडेल. माझे अवयव वाया घालवण्याचा मुद्दा मला समजत नाही. मी तंदुरुस्त राहतो आणि स्वतःला निरोगी ठेवतो. मी आणि माझ्या आईने आमचे अवयव दान करण्यासाठी नोंदणी केली आहे. ही एक अतिशय सुंदर गोष्ट आहे, ज्याद्वारे तुम्ही कोणत्या ना कोणत्या मार्गाने जगू शकता.”, असे देवरकोंडाने सांगितले.
हेही वाचा – Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मध्यरात्री भीषण अपघात; ५ जण ठार
You are real life super HERO @TheDeverakonda I'm very proud to be your fan 🤗 pic.twitter.com/LmQbubSb0t
— Arshi (@im_arshii) November 17, 2022
#VijayDeverakonda celebrating #ChildrensDay by gifting warriors of end-stage liver disease at @PACEHospitals Adult and Pediatric Liver Transplantation Awareness Program #pacehospitals #LiverTransplant @TheDeverakonda 👏🙏🤝👍🫡🤩 pic.twitter.com/Kxh27yauYB
— PACE Hospitals (@PACEHospitals) November 16, 2022
विजय देवरकोंडा पुढे म्हणाला, ”डॉक्टरांनी मला सांगितले आहे की अनेक शस्त्रक्रिया केवळ दात्यामुळेच होतात. इतके लोक आपले अवयव दान करून इतरांना मदत करत आहेत यावर विश्वास बसणे कठीण आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे.” देवरकोंडा आता त्याच्या आगामी चित्रपटात दक्षिण अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत दिसणार आहे. अभिनेत्याचा लायगर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप झाला. आता विजय पुढे काय धमाका करतो ते पाहावे लागेल.