Kamal Haasan Hospitalised : दक्षिण आणि हिंदी जगतातील प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, कमल हसन हैदराबादहून परतत असताना त्यांनी अस्वस्थतेची तक्रार केली, त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता कमल हसन यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप त्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
कमल हसन यांना ताप होता, त्यासाठी त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अलीकडेच कमल हसन आणि दिग्गज दिग्दर्शक के.के. विश्वनाथ या दोघांचेही अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या कमल हसन रिअॅलिटी शो ‘बिग बॉस तमिळ सीझन ६’ होस्ट करण्यात व्यस्त आहेत. त्यासाठी ते गेल्या सहा महिन्यांपासून शूटिंग करत आहेत.
हेही वाचा – चुकूनही Google वर सर्च करू नका या ४ गोष्टी; तुरुंगात जाल
Actor and Makkal Needhi Maiam (MNM) party chief Kamal Haasan was admitted to a hospital in Chennai.
Read at 👇https://t.co/C0Zn6hnmDk#KamalHaasan
— Moneycontrol (@moneycontrolcom) November 24, 2022
२३ नोव्हेंबर रोजी कमल हसन यांना सौम्य तापाची तक्रार आली. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करून काही दिवस घरी आराम करण्यास सांगितले. कमल हसन यांना डिस्चार्ज मिळाल्याचे वृत्त आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यांच्या किंवा त्यांच्या टीमकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
दिग्दर्शक शंकर यांच्या ‘इंडियन २’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये कमल हसन व्यस्त आहेत. यासोबतच ते ‘बिग बॉस तमिळ सीझन ६’ चे शूटिंगही करत आहेत. कमल हसन जेव्हा ‘इंडियन २’ चे शूटिंग पूर्ण करतील, तेव्हा ते दिग्दर्शक मणिरत्नमसोबत काम करण्यास सुरुवात करतील. ‘KH २३४’ असे या चित्रपटाचे नाव आहे. याशिवाय कमल हसन यांच्याकडे दिग्दर्शक पा रंजित यांचाही एक चित्रपट आहे, ज्याचे कोणतेही अपडेट अद्याप आलेले नाही. या चित्रपटाचे शीर्षकही समोर आलेले नाही.