Govinda : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. रिव्हॉल्वर साफ करताना गोविंदाला गोळी लागली. गोविंदाच्या गोळीने जखमी झालेल्या गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सकाळी घडली. पहाटे 4.45 वाजता गोविंदा घराबाहेर पडण्याच्या तयारीत होता.
गोविंदा बाहेर जाण्यापूर्वी त्याचे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर साफ करत होता. मात्र चुकून त्याच्याच रिव्हॉल्वरचा मिस फायर झाला. गोविंदाच्या गुडघ्यावर गोळी लागली आहे. जखमी अवस्थेत त्याला क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता.
हेही वाचा – महाराष्ट्रात देशी गायीला राज्यमाता-गोमाता दर्जा, पालन पोषणासाठीही अनुदान
Actor and Shiv Sena leader Govinda has been taken to the nearest hospital after he was accidentally shot in the leg by his own revolver this morning, says a senior Mumbai Police official
— ANI (@ANI) October 1, 2024
More details awaited.
(file pic) pic.twitter.com/SBqnMcDgoA
आयसीयूमध्ये दाखल
गोविंदाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून हा अपघात 4:45 वाजता कसा घडला याचा तपास सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता. या घटनेबाबत रुग्णालयाने कोणतीही माहिती दिलेली नाही. गोविंदाचे व्यवस्थापक शशी सिन्हा यांनी एएनआयला सांगितले की, गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता. तो परवाना असलेला रिव्हॉल्व्हर ठेवत असताना त्याच्या हातातून रिव्हॉल्व्हर निसटून खाली पडली आणि गोळी त्याच्या पायाला लागली. आता गोविंदाच्या पायातून गोळी काढण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!